Government Job 2021: NIOS मध्ये विविध पदांची भरती, जाणून घ्या डिटेल्स Rojgar News

Government Job 2021: NIOS मध्ये विविध पदांची भरती, जाणून घ्या डिटेल्स Rojgar News

NIOS : एनआयओएसमध्ये सरकारी नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (NIOS) ही भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी एक स्वायत्त आहे. या अंतर्गत ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी मधील एकूण ११५ पदांवर भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. संस्थेने जाहीर केलेल्या जाहिराती (क्र. सप्टेंबर/2021) नुसार, कनिष्ठ सहाय्यक, स्टेनोग्राफर, सहाय्यक, ईडीपी पर्यवेक्षक, शैक्षणिक अधिकारी आणि इतर पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. एनआयओएस भरती २०२१ साठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट nios.ac.in वर ऑनलाइन अर्ज करु शकतात. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ११ सप्टेंबर २०२१ पासून सुरू झाली आहे. उमेदवार १० ऑक्टोबर २०२१ रोजी ११.५९ वाजेपर्यंत यासाठी अर्ज करू शकतील. उमेदवारांना अर्ज करताना संस्थेने निर्धारित केलेले शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल. ग्रुप ए पदासाठी अर्ज शुल्क ७५० रुपये आहे. गट ब आणि क साठी ५०० रुपये अर्ज शुल्क आहे. तथापि, गट अ पदांसाठी शुल्क आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी २५० रुपये आणि गट क पदांसाठी १५० रुपये अर्ज शुल्क आहे. रिक्त पदांचा तपशील संचालक (मूल्यांकन) - १ पद सहसंचालक (मीडिया) - १ पद उपसंचालक (लेखा) - १ पद सहाय्यक संचालक (प्रशासकीय) - २ पदे लेखा अधिकारी - १ पद शैक्षणिक अधिकारी - १७ पदे संशोधन आणि मूल्यमापन अधिकारी - १ पद विभाग अधिकारी - ७ पदे सहाय्यक अभियंता (सिव्हिल) - १ पद हिंदी अधिकारी - १ पद सहाय्यक लेखापरीक्षण अधिकारी - १ पद ईडीपी पर्यवेक्षक - ३७ पदे कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) - १ पद सहाय्यक - ४ पदे स्टेनोग्राफर - ३ पदे कनिष्ठ सहाय्यक - ३६ पदे


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nxKqOy
via nmkadda

0 Response to "Government Job 2021: NIOS मध्ये विविध पदांची भरती, जाणून घ्या डिटेल्स Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel