Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर २७, २०२१ WIB
Last Updated 2021-09-27T08:43:54Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

Government Job 2021: भारतीय लष्कराच्या वेटरनरी कॉर्प्समध्ये भरती, जाणून घ्या तपशील Rojgar News

Advertisement
Government Job 2021: भारतीय सैन्यामध्ये रिमाऊंट वेटरनरी कॉर्प्समध्ये वेटरनरी ग्रॅज्युएट्सना अधिकारी बनण्याची संधी आहे. भारतीय सैन्यातर्फे यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. लष्कराच्या रीमाउंट पशुवैद्यकीय कोरमध्ये भरती झाल्यास शॉर्ट सर्व्हिस कमिशन उपलब्ध होईल. यासाठी उमेदवारांना ऑफलाइन अर्ज करावा लागेल. १८ नोव्हेंबर २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. भारतीय लष्कराने अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वर एएससी नोटिफिकेशन जाहीर केले आहे. यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि निवड प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. पात्रता वयोमर्यादा- उमेदवाराचे वय २१ ते २३ वर्षे असावे. शैक्षणिक पात्रता- BVSc/BVSc अॅण्ड AH पदवीधर असावा. उमेदवार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. अर्जाच्या वेळी उमेदवाराने पात्रता परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच इंटर्नशिप पूर्ण असणे गरजेचे आहे. निवड प्रक्रिया- सर्वप्रथम डायरेक्टरेट जनरल रीमाउंट वेटरनरी सर्व्हिस, इंटीग्रेटेड मुख्यालयाद्वारे अर्ज शॉर्टलिस्ट केले जातील. शॉर्टलिस्ट केलेले अर्ज डायरेक्टरेट जनरल रिक्रूटिंगकडे पाठवले जातील. त्यानंतर SSB मुलाखतीसाठी बोलावले जाईल. SSB मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. मेरिटच्या आधारे अंतिम निवड केली जाईल. असा करा अर्ज उमेदवारांनी दिलेल्या नमुन्यात अर्ज भरावा. नमुना अर्ज भारतीय लष्कराच्या वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता. अर्ज नमुना नोटिफिकेशनसोबत जोडला गेला आहे.फॉर्म भरा आणि आवश्यक कागदपत्रे सोबत जोडा. लिफाफ्यावर application of short service commission in rvc असे लिहा. अर्ज पाठवण्याचा पत्ता उमेदवारांनी आपला अर्ज डायरेक्टरेट जनरल रीमाउंट पशुवैद्यकीय सेवा (RV-1)क्यूएमजी शाखा, एकात्मिक मुख्यालय, संरक्षण मंत्रालय (लष्कर) वेस्ट ब्लॉक -३, तळमजला, विंग क्रमांक -०४. आर के पुरम, नवी दिल्ली -११०६६ या पत्त्यावर पाठवायचा आहे. दिलेल्या मुदतीपर्यंत आलेल्या अर्जाचा विचार केला जाईल. अर्ज भरण्यापुर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. त्यातील तपशील समजून घ्यावा. अर्जामध्ये काही त्रुटी आढळल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zKRn0Y
via nmkadda