Advertisement

Phase 9 2021: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी महत्वाची बातमी आहे. कर्मचारी निवड आयोगाने (SSC) सिलेक्शन पोस्ट फेज -०९ चे नोटिफिकेशन जाहीर केले आहे. IX/2021/निवड पदांच्या अंतर्गत आयोगाने ३२६१ पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना केंद्र सरकारच्या २७१ विभागांमध्ये पोस्टिंग देण्यात येणार आहे. अधिकृत नोटिफिकेशननुसार या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया २४ सप्टेंबर २०२१ पासून सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार कर्मचारी निवड आयोगाची अधिकृत वेबसाइट ssc.nic.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून त्यानंतरच अर्ज करावा. अर्जामध्ये काही विसंगती आढळली तर अर्ज रद्द करण्यात येईल. महत्वाच्या तारखा ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख- २४ सप्टेंबर २०२१ ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख- २५ ऑक्टोबर २०२१ ऑनलाईन फी भरण्याची शेवटची तारीख- २८ ऑक्टोबर २०२१ ऑफलाइन चलान तयार करण्याची अंतिम तारीख- २८ ऑक्टोबर २०२१ चलान द्वारे पेमेंट करण्याची शेवटची तारीख-१ नोव्हेंबर २०२१ कॉम्प्युटर आधारित परीक्षेच्या तारखा- जानेवारी/फेब्रुवारी २०२२ अर्ज फी आयोगाने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार उमेदवारांना १०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. भीम यूपीआय, नेट बँकिंग, व्हिसा, मास्टरकार्ड, क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरून ऑनलाईन शुल्क भरता येऊ शकते. याशिवाय एसबीआय शाखांमध्ये एसबीआय चलान तयार करून देखील शुल्क भरता येईल. महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अपंग व्यक्ती आणि माजी सैनिक अशा आरक्षणासाठी पात्र उमेदवारांना शुल्कात सवलत देण्यात आली आहे. भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार आयोगाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2WaPZam
via nmkadda