Advertisement
for Women: शिक्षणातील महिलांचा सहभाग वाढत असून प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने तसेच मोठ्या हुद्द्यावर काम करताना दिसतात. असे कोणते क्षेत्र नाही जिथे महिलांनी आपला ठसा उमटवला नसेल. खासगी क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढतोय. तसेच केंद्र आणि विविध राज्यांतील सरकारी नोकऱ्यांमध्ये देखील आधीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात महिलांची निवड होताना दिसतेय. अशी काही क्षेत्र आहेत जी स्त्रियांसाठी सर्वोत्तम सरकारी नोकरीचे पर्याय मानले जातात. महिला उमेदवारांच्या पसंतीच्या काही क्षेत्रांबद्दल सविस्तर माहिती घेऊया. टिचिंगमध्ये (Teaching Government Jobs for Women) स्वत:चे करिअर संभाळण्यासोबतच स्त्रिया घराची काळजी घेणे आणि मुलांची काळजी घेण्याची जबाबदारीही संभाळत असतात. अशावेळी टिचिंग क्षेत्रातील सरकारी नोकरी ही महिलांसाठी उपयोगी ठरते. कारण शाळेत दुपारपर्यंत शिकवणीचे काम केल्यानंतर त्यांना कुटुंबालाही देता येतो.'सरकारी किंवा खासगी शिकवणीच्या नोकऱ्या महिलांसाठी सर्वोत्तम असतात. कारण नोकरी करणाऱ्या महिलांव्यतिरिक्त ती कुटुंबालाही वेळ देऊ शकते. जर तुमची स्वतःची मुले सुद्धा त्याच शाळेत शिकत असतील तर यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही' असे दक्षिण दिल्लीतील ग्लोरी पब्लिक स्कूलमध्ये हिंदी शिकवणाऱ्या शिक्षिका प्रज्ञा श्रीवास्तव यांनी सांगितले. सरकारी नोकऱ्यांमध्ये (Teaching Government Jobs for Women) शालेय स्तरावर नर्सरी शिक्षक, प्राथमिक शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (टीजीटी), पदव्युत्तर शिक्षक (पीजीटी) या पदांवर भरती केली जाते. केंद्रीय विद्यालये, जवाहर नवोदय विद्यालय, सैनिक शाळा, एकलव्य मॉडेल निवासी शाळा यामध्ये केंद्रीय स्तरावर भरती केली जाते. त्यानंतर विविध राज्यांमध्ये संबंधित सेवा निवड मंडळ / आयोगाद्वारे वेळोवेळी अध्यापन पदांवर भरती केली जाते. बँकिंगमध्ये सरकारी नोकऱ्या (Banking Government Jobs for Women) बँकिंग क्षेत्रातील सरकारी नोकऱ्या देखील महिलांसाठी सर्वोत्तम मानल्या जातात. कारण बँकामध्ये कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण आणि चांगले वेतन आणि करिअर वाढ मिळते. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या किमान १५ टक्के शाखांमध्ये सर्व महिला कर्मचारी आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी संसदीय समितीने महत्वाचे निर्णय घेतले आहेत. मेडिकल फिल्डमध्ये सरकारी नोकरी (Medical Government Jobs for Women) महिलांसाठी सर्वोत्तम सरकारी नोकऱ्यांच्या यादीत वैद्यकीय क्षेत्र पुढे आहे. ज्यात वैद्यकीय आणि पॅरा-मेडिकल दोघांचा समावेश आहे. रेल्वे, पीएसयू, डिफेन्स इत्यादी विविध केंद्रीय संस्थांच्या अंतर्गत वैद्यकीय शासकीय नोकऱ्या तसेच राज्य सरकारांच्या अंतर्गत सरकारी रुग्णालयांमध्ये सर्जन, निवासी डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ डॉक्टर इत्यादींसह पॅरा-मेडिकल स्टाफ, नर्स, फिजिओथेरपिस्ट, लॅब तंत्रज्ञ, इत्यादींची भरती केली जाते. केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे (यूपीएससी) केंद्रीय वैद्यकीय सेवा (सीएमएस) परीक्षेद्वारे दरवर्षी केंद्रीय संस्थांसाठी ग्रुप ए पदांची भरती केली जाते. तर संबंधित संस्थेमार्फत ग्रुप बी पदांची भरती केली जाते. ही भरती राज्य स्तरावर संबंधित वैद्यकीय विभाग किंवा वैद्यकीय भरती मंडळाद्वारे केली जाते.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3AiNBNL
via nmkadda