ICAI CA Inter Result 2021: सीए इंटरमिडिएट परीक्षेत मुंबईची प्रिती कामत अव्वल Rojgar News

ICAI CA Inter Result 2021: सीए इंटरमिडिएट परीक्षेत मुंबईची प्रिती कामत अव्वल Rojgar News

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (ICAI)चार्टर्ड अकाउंटंट इंटरमिडीएट परीक्षेचा निकाल जाहीर रविवार १९ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री जाहीर केला. मुंबईची प्रिती नंदन कामत ही विद्यार्थीनी या परीक्षेत अव्वल आली आहे. तिला ७०० पैकी ३८८ गुण मिळाले आहेत. जुन्या आणि नव्या दोन्ही अभ्यासक्रमांचा निकाल icai.nic.in, caresults.icai.org आणि icaiexam.icai.org या अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. प्रिती कामत ही ओल्ड कोर्सच्या अभ्यासक्रमाच्या निकालात पहिली आली. दिल्लीचा अर्जुन मेहता नव्या अभ्यासक्रमाच्या निकालात पहिला आला आहे. त्याला ८०० पैकी ६७४ गुण आहेत. अर्जुन पाठोपाठ दिल्लीचीच महिन नइम दुसरी तर बंगळुरूचा सुदीप्ता मेन्या तिसरा आला आहे. निकालाबाबतची सूचना आयसीएआयच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी सीए इंटरमिडिएट परीक्षा दिली होती, आणि त्यांना त्यांचा निकाल ई-मेलद्वारे हवा आहे, त्यांनी icaiexam.icai.org या संकेतस्तळावर जाऊन नोंदणी करावी. 2021 कसा तपासावा? - सर्वात आधी अधिकृत संकेतस्थळ icai.nic.in वर जा. - ‘announcements’ विंडोवर क्लिक करा. - आता एक नवे पेज उघडेल. तेथे ओल्ड किंवा न्यू सिलॅबसच्या रिझल्ट लिंकवर क्लिक करा. - येथे तुमची विचारलेली माहिती भरा. रजिस्ट्रेशन नंबर किंवा PIN क्रमांकासह रोल नंबर भरा. - ICAI CA Intermediate Examination 2021 (Old/New) result स्क्रीनवर दिसेल. - भविष्यातील संदर्भासाठी निकाल डाऊनलोड करून प्रिंट आऊट घेऊन ठेवा. उमेदवारांनी निकाल काळजीपूर्वक पाहावा. नाव, अभ्यासक्रमाचे नाव, अन्य माहिती तपासावी. दरम्यान, आयसीएआयने सीए डिसेंबर २०२१ परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. उमेदवार ३० सप्टेंबर पर्यंत अर्ज भरू शकणार आहेत. विलंब शुल्कासह अर्ज करण्याची अंतिम मुदत ३ ऑक्टोबर आहे. ५ ते २० डिसेंबरपर्यंत आयसीएआय सीए फाउंडेशन, इंटरमिडिएट आणि अंतिम परीक्षा होणार आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CvRD5N
via nmkadda

0 Response to "ICAI CA Inter Result 2021: सीए इंटरमिडिएट परीक्षेत मुंबईची प्रिती कामत अव्वल Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel