ICAI CA July Exam: जुलै CA परीक्षेत ऑप्ट आऊट करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे निर्देश Rojgar News

ICAI CA July Exam: जुलै CA परीक्षेत ऑप्ट आऊट करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे निर्देश Rojgar News

CA July Exam: करोना प्रादुर्भावामुळे परीक्षेत ऑप्ट आऊटचा पर्याय निवडलेल्या उमेदवारांसाठी परीक्षेचे आयोजन करण्याच्या निर्देशाला विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली. ICAI तर्फे सर्वोच्च न्यायालयात याला उत्तर देण्यात आले. करोनामुळे जुलैमध्ये झालेल्या सीए परीक्षेत सहभागी होऊ न शकलेल्या उमेदवार संधी गमवणार नाहीत असे इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडिया (ICAI)ने सर्वोच्च न्यायालयात सांगितले. करोनामुळे जुलैमध्ये झालेल्या CA परीक्षेला बसता येऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑप्ट आऊटचा पर्याय देण्यात आला होता. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकाकर्त्यांनी संस्थेला याबाबत अहवाल सादर करावा असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. अहवालावर दोन आठवड्यांत योग्य निर्णय घेतला जाईल असे आयसीएआयच्या वकिलांनी न्या. एएम खानविलकर यांच्या खंडपीठाला सांगितले. जे उमेदवार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जुलैमध्ये झालेल्या परीक्षेला बसले नाहीत, ते संधी गमावणार नाहीत असे संस्थेची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील रामजी श्रीनिवास यांनी खंडपीठाला सांगितले. खंडपीठाच्या सदस्यांमध्ये न्या. ऋषिकेश रॉय आणि न्या. सीटी रविकुमार यांचाही समावेश आहे. जे विद्यार्थी परीक्षेत बसले नाहीत ते संधी गमावतील असे याचिकाकर्त्यांकडून उपस्थित असलेले ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी म्हटले. यावर श्रीनिवासन म्हणाले, 'ज्यांनी परीक्षेत न बसण्याचा पर्याय निवडला ते कोणतीही संधी सोडणार नाहीत.' फायनल, इंटर कोर्स परीक्षेसाठी शेवटचा अटेम्प्ट इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया(ICAI) ने अंतिम आणि इंटरमीडिएट अभ्यासक्रमांसाठी CA परीक्षा २०२१ मध्ये उपस्थित राहण्याचा फायनल अटेम्प्ट नोव्हेंबर २०२१ पर्यंत वाढवला आहे. या कोर्सेसच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अटेम्प्ट वाढविण्यात आला आहे. अधिकृत सूचनेनुसार, करोना प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांना होणारा त्रास दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मे २०२१ च्या परीक्षेच्या प्रक्रियेतून बाहेर झालेल्या किंवा न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी हा विस्तार करण्यात आला आहे. नोव्हेंबर २०२१ च्या परीक्षा जुन्या अभ्यासक्रमांतर्गत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शेवटचा प्रयत्न असेल. जुनी अभ्यासक्रम योजना कायमची बंद केली जाणार असल्याने विद्यार्थ्यांना यापुढे मुदतवाढ दिली जाणार नाही.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nnbU9n
via nmkadda

0 Response to "ICAI CA July Exam: जुलै CA परीक्षेत ऑप्ट आऊट करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे निर्देश Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel