Advertisement
CA July 2021 Exam: इंस्ट्यिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडिया (Institute of Chartered Accountants of India,ICAI) ने चार्टर्ड अकाउंटंट्स (CA) जुलै २०२१ जुना, नवीन अभ्यासक्रम आणि फाउंडेशन अंतिम परीक्षेच्या निकालाची तारीख आणि वेळ जाहीर केला आहे. नोटिफिकेशननुसार निकाल १३ सप्टेंबर किंवा १४ सप्टेंबर २०२१ रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. परीक्षेला बसलेले विद्यार्थी निकाल जाहीर झाल्यानंतर अधिकृत वेबसाइट icai.org वर निकाल पाहू शकतात. आयसीएआयने अधिकृत वेबसाइटवर या संदर्भात एक ट्विट देखील केले आहे. या ट्विटवरील सुचनेनुसार, जुलै २०२१ मध्ये आयोजित चार्टर्ड अकाऊंट्स अंतिम परीक्षा (जुना आणि नवा अभ्यासक्रम) आणि फाऊंडेशन परीक्षेचा परीक्षेचा निकाल सोमवार, १३ सप्टेंबर (संध्याकाळी)/मंगळवार १४ सप्टेंबर २०२१ घोषणा होण्याची शक्यता आहे. सीएची अंतिम परीक्षा ५ जुलै ते १९ जुलै दरम्यान घेण्यात आली. सीए अंतिम (जुनी स्कीम) गट १ ची परीक्षा ५, ७, ९ आणि ११ जुलै रोजी आणि सीए अंतिम (जुनी स्कीम) गट २ ची परीक्षा १३, १५, १७ आणि १९ जुलै रोजी घेण्यात आली होती. या परीक्षांना बसलेले उमेदवार त्यांचे निकाल अधिकृत वेबसाइट icaiexam.icai.org, caresult.icai.org, icai.nic.in वर पाहू शकतात. अंतिम परीक्षेचा निकाल (जुना अभ्यासक्रम आणि नवीन अभ्यासक्रम) आणि फाउंडेशन परीक्षेच्या उमेदवारांना ईमेलद्वारे त्यांचा निकाल मिळू शकेल. उमेदवारांना ११ सप्टेंबरपासून icaiexam.icai.org या वेबसाइटवर त्यांचे अर्ज करता येईल. जे विद्यार्थी यासाठी अर्ज नोंदणी करतील त्यांना त्यांच्या नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर रिझल्ट उपलब्ध होईल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2YHNugB
via nmkadda