Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर १७, २०२१ WIB
Last Updated 2021-09-17T09:43:51Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

सीए इंटरमीडिएट परीक्षांच्या निकालासंदर्भात ICAI कडून महत्वाची नोटीस जाहीर Rojgar News

Advertisement
CA Intermediate : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया () ने चार्टर्ड अकाउंटंट्स (CA) च्या इंटरमीडिएट (ओल्ड कोर्स आणि न्यू कोर्स) परीक्षांचा निकाल जाहीर केला आहे. संस्थेने १७ सप्टेंबर २०२१ रोजी शेअर केलेल्या अपडेटनुसार, सीए इंटर निकाल हा १९ सप्टेंबर किंवा दुसऱ्या दिवशी २० सप्टेंबर २०२१ रोजी संध्याकाळी जाहीर केला जाऊ शकतो. ऑप्ट आऊट पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांसाठी सीए इंटरमीडिएट परीक्षा २८ जून ते २० जुलै आणि इतर विद्यार्थ्यांसाठी ६ जुलै ते २० जुलै दरम्यान घेण्यात आल्या. सीए इंटर निकाल २०२१ असा तपासा सीए इंटर परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचे निकाल तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइट icaiexam.icai.org वर जा. त्यानंतर होमपेजवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.निकाल पेजवर आपल्याला आपल्या संबंधित अभ्यासक्रमाच्या निकालासाठी लिंक सक्रीय झाल्यावर क्लिक करा. मग नवीन पेजवर तुमचा रोल नंबर आणि पिन तपशील भरा आणि सबमिट करा. यानंतर, विद्यार्थी स्क्रीनवर त्यांचा निकाल आणि स्कोअर कार्ड पाहू शकतील. त्याची प्रिंट घेतल्यानंतर सॉफ्ट कॉपी संभाळून ठेवा. सीए इंटर निकाल २०२१ ईमेलवर 'चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया' (ICAI) ने चार्टर्ड अकाउंटंट्स (CA) ने 'सीए इंटरमीडिएट निकाल २०२१' विद्यार्थ्यांच्या ईमेल आयडीवर उपलब्ध करण्याची व्यवस्था केली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना त्यांचे 'सीए इंटर निकाल २०२१' ईमेलद्वारे मिळविण्यासाठी अधिकृत वेबसाइट icaiexam.icai.org वर जाऊन नोंदणी करावी लागेल. द्वारे सीए इंटर निकाल २०२१ ची घोषणा झाल्यानंतर उमेदवारांना त्यांचे स्कोअरकार्ड ईमेलवर पाठवले जाईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2YZVCJr
via nmkadda