ICAR AIEEA परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जारी Rojgar News

ICAR AIEEA परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जारी Rojgar News

Admit Card 2021: राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सी () ने ICAR AIEEA पोस्ट ग्रॅज्युएशन परीक्षा 2021 साठी प्रवेशपत्र जारी केले आहे. एजन्सीने भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अभ्यासक्रमांसाठी होणारी प्रवेश परीक्षा ICAR AIEEA या पीजी परीक्षेसाठी हॉल तिकिटे अधिकृत वेबसाइट icar.nta.ac.in वर जारी केली आहेत. ज्या उमेदवारांनी ICAR AIEEA PG परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज केले होते ते आता आवश्यक तपशील भरून अधिकृत पोर्टलवरून अॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकतात. याशिवाय या वृत्तात पुढे दिलेल्या पद्धतीने देखील अॅडमिट कार्ड डाऊनलोड केले जाऊ शकते. ICAR Admit Card 2021: पुढील पद्धतीने प्रवेशपत्र डाऊनलोड करा - ICAR AIEEA PG डाउनलोड करण्यासाठी, उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइट https://icar.nta.ac.in/ ला भेट द्या. - त्यानंतर 'ICAR प्रवेशपत्र AIEEA PG 2021 कार्ड डाउनलोड करा' असे सांगणाऱ्या संबंधित अधिसूचनेवर क्लिक करा. - यानंतर स्क्रीनवर एक नवीन विंडो उघडेल. - उमेदवारांनी लक्षात घ्यावे की त्यांना त्यांचा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड किंवा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख भरावी लागेल. - यानंतर प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल. - उमेदवारांनी प्रवेशपत्र डाऊनलोड करावे आणि त्याची प्रत भविष्यातील संदर्भासाठी ठेवावी. AITAE PG आणि AICE परीक्षा NTA कडून १७ सप्टेंबर २०२१ रोजी संगणक आधारित मोडमध्ये घेतली जाईल. एनटीएने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, उमेदवारांनी प्रवेशपत्रातील तपशील जसे की निवडलेला विषय, परीक्षा केंद्राचे स्थान, परीक्षा वेळ आणि इतर माहिती तपासणे आवश्यक आहे. अॅडमिट कार्डमध्ये काही चूक असल्यास, ती वेळेत दुरुस्त करा. AIEEA PG परीक्षा दोन तासांच्या कालावधीसाठी घेतली जाईल. उमेदवारांनी हे लक्षात घेतले पाहिजे की एनटीए कोणालाही प्रवेशपत्र पोस्टाने पाठवणार नाही. या व्यतिरिक्त, कोणतीही शंका असल्यास, उमेदवार एनटीए हेल्पलाइन नंबर -०११-४०७५९००० वर संपर्क साधू शकतात किंवा मेल id-icar@nta.ac.in वर लिहू शकतात. त्याच वेळी, परीक्षेशी संबंधित अधिक माहितीसाठी, विद्यार्थी अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2YOcWkI
via nmkadda

0 Response to "ICAR AIEEA परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जारी Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel