Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर १७, २०२१ WIB
Last Updated 2021-09-17T06:43:40Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

ICAR AIEEA यूजी प्रवेश परीक्षेसाठी उत्तरतालिका जाहीर Rojgar News

Advertisement
AIEEA :नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने ICAR यूजी परीक्षा उत्तरतालिका २०२१ जाहीर केली आहे. पदवीधर अभ्यासक्रमांसाठी ऑल इंडिया प्रवेश परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट icar.nta.ac.in वर जाऊन NTA ICAR परीक्षेची उत्तरतालिका तपासू आणि डाउनलोड करू शकतात. १७ डिसेंबरपर्यंत उत्तरतालिकेवर हरकती नोंदविता येणार आहेत. अधिकृत नोटिफिकेशननुसार, उत्तरतालिकेमध्ये दिलेल्या कोणत्याही प्रश्नांच्या उत्तराबद्दल समाधानी नसलेले उमेदवार ऑनलाइन अर्ज भरून पुढे आक्षेप नोंदवू शकतात. उमेदवारांना प्रति प्रश्न २०० रुपये शुल्क भरावे लागेल. केवळ मुख्य आव्हान लिंकद्वारे निर्धारित वेळेत शुल्क भरलेल्या आक्षेपांचा विचार केला जाईल. विषय तज्ञांचा समावेश असलेली एजन्सी उमेदवारांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांची तपासणी करेल. यात योग्य आढळल्यास उत्तरतालिकेत सुधार केला जाईल आणि अंतिम उत्तरतालिका जाहीर केली जाईल. अंतिम उत्तरतालिका जाहीर झाल्यानंतर निकाल जाहीर केला जाईल. ICAR AIEEA UG उत्तरतालिका डाऊनलोड करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा स्टेप १ : सर्वातआधी अधिकृत वेबसाइट icar.nta.ac.in वर जा. स्टेप २: वेबसाइटवर दिलेल्या उत्तरतालिका लिंकवर क्लिक करा. स्टेप ३: मागितलेली माहिती भरा आणि सबमिट करा. स्टेप ४: तुमची उत्तरतालिका स्क्रीनवर दिसेल. स्टेप ५: उत्तरतालिका तपासा आणि डाउनलोड करा. बातमीखाली दिलेल्या थेट लिंकवरून ICAR AIEEA UG उत्तरतालिका २०२१ डाउनलोड करु शकता एआयईईए यूजी २०२१, एआयईईए पीजी २०२१ आणि एआयईईए पीएचडी २०२१ प्रवेश परीक्षा कॉम्प्युटर आधारित चाचणी (CBT) माध्यमातून घेतल्या गेल्या. या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या असतात. ज्यात बहुपर्यायी प्रश्न (MCQ) असतात. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) पदव्युत्तर आणि डॉक्टरेट अभ्यासक्रम तसेच UG अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या ऑल इंडिया एन्ट्रन्स एक्झाम (AIEEA) २०२१ साठी अर्ज प्रक्रिया २५ जुलैपासून सुरू झाली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hFEqQ5
via nmkadda