Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, १४ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर १४, २०२१ WIB
Last Updated 2021-09-14T09:51:47Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

ICG Exam 2021: भारतीय तटरक्षक दलात भरती, जाणून घ्या डिटेल्स Rojgar News

Advertisement
ICG Navik and Yantrik Exam 2021: इंडियन कोस्ट गार्डमध्ये नाविक आणि यांत्रिक पदांसाठी एकूण ३५० रिक्त पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतीय तटरक्षकद्वारे नाविक (जनरल ड्यूटी), नाविक (डोमेस्टिक ब्रांच) आणि यांत्रिक (मेकेनिकल, इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स) पदांवर जानेवारी २०२२ सत्रासाठी होणाऱ्या परीक्षेची तारीख आणि परीक्षेचे शहर याची माहिती १४ सप्टेंबरला जाहीर होणार आहे. भारतीय तटरक्षक दलाची अधिकृत वेबसाइट joinindiancoastguard.cdac.in वर यासंदर्भात अपडेट जाहीर करण्यात आले आहे. उमेदवारांना या पोर्टलवर परीक्षेची तारीख आणि शहराचा तपशील पाहता येणार आहे. उमेदवारांनी वेबसाइटवर जाऊन नोंदणीकृत ईमेल आयडी आणि पासवर्डद्वारे लॉगिन केल्यास परीक्षेची तारीख आणि शहराची माहिती मिळू शकेल. दोन दिवस आधी प्रवेशपत्र भारतीय तटरक्षक दलाने नोटिसीमध्ये दिलेल्या माहितीनुसार, परीक्षेत बसलेल्या उमेदवारांना परीक्षेच्या दोन दिवस आधी प्रवेशपत्र मिळणार आहे. अधिकृत पोर्टलवर जाऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करता येऊ शकेल. यासंबंधीचा तपशील भारतीय तटरक्षक दलाकडून उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर पाठवला जाईल. परीक्षेसाठी सूचना भारतीय तटरक्षक दलाने नाविक, यांत्रिक भरती परीक्षेस बसलेल्या उमेदवारांसाठी अनेक सूचना जाहीर केल्या आहेत. परीक्षेला जाताना उमेदवारांनी दहावीची गुणपत्रिका, फोटो आयडी, ई-प्रवेशपत्राची प्रिंट-आउट आणि दोन पासपोर्ट आकाराचे फोटो सोबत आणणे आवश्यक आहे. आयसीजीतर्फे सोबत चेकलिस्ट देखील जाहीर करण्यात आली आहे. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3tGBJTi
via nmkadda