Indian Navy Recruitment 2021: भारतीय नौदलात नोकरीची संधी; विविध पदांवर भरती Rojgar News

Indian Navy Recruitment 2021: भारतीय नौदलात नोकरीची संधी; विविध पदांवर भरती Rojgar News

Recruitment 2021: जर तुम्हाला भारतीय नौदलात नोकरी करायची असेल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची असू शकते. भारतीय नौदलाने १०+२ (B.Tech) कॅडेट एन्ट्री स्कीमसाठी अर्ज मागवले आहेत. या रिक्त जागा विविध शाखांसाठी आहेत. यामध्ये शिक्षण, कार्यकारी आणि तांत्रिक शाखांचा समावेश आहे. या शाखांसाठी अविवाहित पुरुषांची नियुक्ती केली जाईल. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पुढील महिन्यापासून म्हणजेच १ ऑक्टोबरपासून सुरू होईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख १० ऑक्टोबर असेल. उमेदवारांकडे अर्जांसाठी फक्त दहा दिवसांचा अवधी आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर उमेदवारांनी शक्य तितक्या लवकर फॉर्म भरावा. अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना अधिकृत वेबसाइट .gov.in वर ऑनलाइन अर्ज करावा लागेल. जेईई मेन २०२१ (बीई/बीटेक) परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना NTA ने प्रकाशित केलेल्या JEE Main 2021 ऑल इंडिया रँकच्या आधारावर त्यांना आता सर्व्हिस सिलेक्शन बोर्डसाठी बोलावले जाईल. यानंतर, अंतिम निवड SSB च्या आधारावर केली जाईल. या तारखा लक्षात ठेवा ऑनलाइन अर्ज सादर करण्याची तारीख - १ ऑक्टोबर २०२१ ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख - १० ऑक्टोबर २०२१ रिक्त पदांचा तपशील शिक्षण शाखा- ५ पदे कार्यकारी आणि तांत्रिक - ३० पदे शैक्षणिक पात्रता नौदलाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (PCM) मध्ये किमान ७० टक्के एकूण गुणांसह बारावी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. इंग्रजीमध्ये किमान ५० टक्के गुण असणे आवश्यक आहे (एकतर १० वी किंवा १२ वी मध्ये). याशिवाय, शैक्षणिक पात्रतेशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. उमेदवारांनी लक्षात घ्यावे की गुणवत्ता यादी SSB गुणांच्या आधारे तयार केली जाईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hZ7Ton
via nmkadda

0 Response to "Indian Navy Recruitment 2021: भारतीय नौदलात नोकरीची संधी; विविध पदांवर भरती Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel