Advertisement
CIO : सरकारी किंवा खासगी विमा कंपन्यांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी सरकारी नोकरीची संधी चालून आली आहे. विमा लोकपाल परिषदेने (Council for Insurance Ombudsmen -CIO)स्पेशलिस्ट पदाच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून लाइफ/जनरल इंश्युरन्समध्ये सरकारी नोकरी, खासगी कंपन्यांमध्ये काम करणारे, सेवानिवृत्त, स्वेच्छा निवृत्ती घेतलेले किंवा राजीनामा दिलेले प्रोफेशनल्स यासाठी अर्ज करु शकतात. ही भरती विशिष्ट कालावधीसाठी असणार आहे. देशभरातील १७ कार्यालयांमध्ये एकूण ४९ रिक्त जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवाराचा कामाचा कालावधी जास्तीत जास्त ३ वर्षांचा असेल. उमेदवाराच्या कामगिरीच्या आधारे कालावधी दरवर्षी वाढविण्यात येईल. असा करा अर्ज विमा लोकपाल परिषदेत तज्ञ पदाच्या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट cioins.co.in वर जाऊन नोटिफिकेशन आणि अर्जाचा नमुना पाहू शकतात. बातमीखाली दिलेल्या थेट लिंकवर जाऊन नोटिफिकेशन डाऊनलोड करता येऊ शकते. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अर्ज पूर्ण भरून आणि आवश्यक कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत जाहिरातीत दिलेल्या ईमेल आयडीवर पाठवायचा आहे. यासाठी Specialist.life@cioins.co.in किंवा general@cioins.co.in ईमेल आयडी देण्यात आला आहे. उमेदवार १७ सप्टेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात. यानंतर आलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. पात्रता निकष जाणून घ्या अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना सरकारी किंवा खाजगी विमा कंपनीमध्ये जीवन विमा किंवा सामान्य विमा क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव असावा. सध्या कार्यरत, नोंदणीकृत किंवा सेवानिवृत्त प्रोफेशनल्स अर्ज करू शकतात. १७ सप्टेंबर २०२१ या अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत उमेदवाराचे वय ५० वर्षांपेक्षा कमी आणि ६३ वर्षांपेक्षा जास्त नसावे. पात्रता आणि इतर तपशीलांविषयी अधिक माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kU8Peg
via nmkadda