Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर १७, २०२१ WIB
Last Updated 2021-09-17T12:43:54Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

IRCTC मध्ये दहावी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी Rojgar News

Advertisement
Apprentice 2021: भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन अर्थात IRCTC मध्ये काम करण्याची इच्छा असेल तरी ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाअंतर्गत तिकीट, खानपान आणि पर्यटन सेवा पुरवणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी IRCTC मध्ये प्रशिक्षणार्थी पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. याअंतर्गत १०० ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक पदांवर अप्रेटिसशिप रिक्त पदे भरली जाणार आहेत. पात्रता निकष IRCTC अॅप्रेंटिसशिप भरती अंतर्गत १०० ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी (मॅट्रिक, हायस्कूल, माध्यमिक, सेकेंडरी) परीक्षा किंवा विद्यापीठातून कोणतीही समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. यासाठी उच्च शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया उमेदवारांनी भारत सरकारची अधिकृत वेबसाइट apprenticeshipindia.org किंवा apprenticeship portal ला भेट देणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रियेचा एक भाग म्हणून, उमेदवारांना प्रथम नोंदणी करावी लागेल. ज्यासाठी त्यांना स्वत:चे नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख, लिंग, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी यासारखी मूलभूत माहिती भरावी लागतील. त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत ईमेलद्वारे किंवा दिलेल्या उमेदवाराचा कोड आणि पासवर्डद्वारे लॉगिन करून IRCTC मध्ये अॅप्रेंटिसशिप १०० ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक पदासाठी अर्ज सबमिट करु शकता. अॅप्रेंटिसशिप १५ महिन्यांसाठी आलेल्या अर्जातून उमेदवार शॉर्टलिस्ट केले जातील. यानंतर ठरलेल्या प्रक्रियेतून अंतिम निवड केली जाणार आहे. यानंतर १५ महिन्यांसाठी अप्रेंटिसशिप दिली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांची पहिली बेसिक ट्रेनिंग ५०० तासांची असेल. त्यानंतर १२ महिने नोकरीचे प्रशिक्षण दिले जाईल. दरमहा ९ हजार रुपये स्टायपेंड प्रशिक्षणार्थी म्हणून निवडण्यात आलेल्या उमेदवारांना दरमहा ७ हजार ते ९ हजार रुपये स्टायपेंड देण्यात येईल. तसेच त्यांना NAPS च्या सुविधा दिल्या जातील. उमेदवारांना आठवड्यातून ६ दिवस काम करावे लागेल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lPzEAX
via nmkadda