IREL सरकारी कंपनीमध्ये विविध पदांची भरती, तपशील जाणून घ्या Rojgar News

IREL सरकारी कंपनीमध्ये विविध पदांची भरती, तपशील जाणून घ्या Rojgar News

IREL : अणुऊर्जा विभागात सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या कामाची बातमी आहे. आयआरईएल (इंडिया) लिमिटेड या भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाअंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने देशभरातील त्याच्या प्रकल्प / युनिट / कार्यालयातील ५४ पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यानुसार पदवीधर प्रशिक्षणार्थी (वित्त), पदवीधर प्रशिक्षणार्थी (एचआर), डिप्लोमा प्रशिक्षणार्थी (तांत्रिक), कनिष्ठ पर्यवेक्षक (राजभाषा), वैयक्तिक सचिव आणि व्यापारी प्रशिक्षणार्थी (CO/HRM/07/2021) या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. जात आहेत. असा करा अर्ज इच्छुक उमेदवारांनी IREL (इंडिया) लिमिटेडची अधिकृत वेबसाइट irel.co.in वरील करिअर सेक्शनमध्ये जावे. करिअर पेजवर जाहिरात क्र (CO/HRM/07/2021) भरतीची जाहिरात डाऊनलोड करावी. त्याप्रमाणे ऑनलाईन अर्ज करावा. याची थेट लिंक बातमीखाली देण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करून किंवा खाली दिलेल्या थेट लिंकवरुन उमेदवार अर्जाच्या पेजवर जाऊ शकतात. त्यांना नवीन नोंदणीवर क्लिक करून आधी नोंदणी करावी लागेल. नंतर त्यांच्या ईमेल आयडी आणि क्रेडेंशियल लॉगिन करून अर्ज सबमिट करावा. मधील या पदांसाठी अर्ज प्रक्रिया १५ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. ५ ऑक्टोबर २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करताना ४०० रुपये शुल्क भरावे लागेल. जे ऑनलाईन पद्धतीने (डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग इ.) भरता येईल. एससी, एसटी, ईएसएम, दिव्यांग आणि महिला उमेदवारांना अर्ज फी भरावी लागणार नाही. त्यांना यामध्ये सवलत देण्यात आली आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, पात्रता निकष, निवड प्रक्रिया आणि विविध पदांसाठी इतर माहिती वेबसाइटवरील जाहिरातीमध्ये देण्यात आली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ErvM1u
via nmkadda

0 Response to "IREL सरकारी कंपनीमध्ये विविध पदांची भरती, तपशील जाणून घ्या Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel