ISRO आणि CBSE चे शालेय विद्यार्थ्यांसाठी 'स्पेस चॅलेंज' Rojgar News

ISRO आणि CBSE चे शालेय विद्यार्थ्यांसाठी 'स्पेस चॅलेंज' Rojgar News

Space Challenge: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ () यांच्या सहकार्याने नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनने देशातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी '' आणले आहे. हे आव्हान देशातील सर्व शाळांमधील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी तयार करण्यात आले आहे. यामध्ये ATL (अटल टिंकरिंग लॅब) प्रयोगशाळा असलेल्या शाळा देखील ATL नसलेल्या शाळांशी संबंधित आहेत. अधिकृत निवेदनात यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या सहकार्याने अटल इनोव्हेशन मिशन (AIM) ने देशातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ATL स्पेस चॅलेंज सादर केले आहे, असे निवेदनात म्हटले आहे. इयत्ता सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना खुले व्यासपीठ प्रदान करण्यात आले आहे. जिथे विद्यार्थी नवकल्पना सादर करू शकतात आणि स्वतः डिजिटल युगाच्या अंतराळ तंत्रज्ञानाशी संबंधित समस्या सोडवू शकतात. एटीएल स्पेस चॅलेंज २०२१ हे जागतिक अंतराळ सप्ताह २०२१ सोबत जोडण्यात आले आहे. अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदानाची आठवण म्हणून हा सप्ताह दरवर्षी ४ ते १० ऑक्टोबर दरम्यान जागतिक पातळीवर साजरा केला जातो. शालेय तरुण विद्यार्थ्यांना अंतराळ क्षेत्रात काहीतरी निर्माण करण्यासाठी नवकल्पना करण्यास सक्षम करणे या आव्हानाचा उद्देश आहे. यामुळे त्यांना अवकाशाबद्दल जाणून घेण्याची संधी मिळेल. तसेच ते अंतराळ कार्यक्रमातील समस्यांचे समाधान शोधण्यास सक्षम असतील असे कार्यक्रमाचे उद्घाटन करताना अटल इनोव्हेशन मिशनचे मिशन संचालक चिंतन वैष्णव यांनी सांगितले. अटल इनोव्हेशन मिशन (AIM), नीति आयोग भारतीय अंतराळ संशोधन संस्था () आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने देशातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी ATL स्पेस चॅलेंज २०२१ सुरू करण्यात आले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3z4qNjl
via nmkadda

0 Response to "ISRO आणि CBSE चे शालेय विद्यार्थ्यांसाठी 'स्पेस चॅलेंज' Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel