Advertisement
म. टा. प्रतिनिधी, पुणे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (ITI) प्रवेश घेण्यासाठी दहावीत १०० टक्के गुण मिळवणाऱ्या १०२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, या विद्यार्थ्यांचे नाव गुणवत्ता यादीत (ITI Merit List 2021) जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे कौशल्यांवर आधारित अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल दिसत आहे. 'आयटीआय' प्रवेशासाठी पहिली निवड यादी सोमवारी जाहीर झाली असून, ९० हजार ५४१ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाले आहेत. या विद्यार्थ्यांना ७ ते ११ सप्टेंबर या कालावधीत प्रवेश घ्यावा लागणार आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून (DVET) राज्यातील सरकारी आणि खासगी 'आयटीआय'मध्ये प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रवेश प्रक्रियेची अंतिम गुणवत्ता यादी रविवारी प्रसिद्ध झाली. त्यामध्ये दोन लाख ५८ हजार ५६८ विद्यार्थी आहेत. त्यानंतर सोमवारी ९० हजार ५४१ विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर झाली आहे. त्यानुसार दहावीत १०० टक्के गुण मिळालेल्या १०२ विद्यार्थ्यांनी 'आयटीआय' प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. त्याचप्रमाणे ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या साधारण ९०० विद्यार्थ्यांनी यंदा प्रवेश प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवला आहे. या विद्यार्थ्यांची नावे अंतिम गुणवत्ता यादीत आहेत. त्याचप्रमाणे निवड यादीमध्येही विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी चांगले 'आयटीआय' मिळाले आहे. ''ने सोमवारी निवड यादी जाहीर केली आहे. या यादीतील विद्यार्थ्यांना 'लॉग इन आयडी'चा वापर करून, प्रवेश कन्फर्म करावा लागणार आहे. त्याबाबची सविस्तर माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना ७ ते ११ सप्टेंबर या कालावधीत 'आयटीआय'ला प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घ्यावा लागणार आहे. प्रवेश घेताना विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी होईल, असे 'डीव्हीईटी'कडून सांगण्यात आले आहे. ९१ प्रकारचे अभ्यासक्रम 'आयटीआय' प्रवेशासाठी ९१ प्रकारचे व्यवसाय अभ्यासक्रम उपलब्ध असून, ८० अभ्यासक्रमांसाठी दहावी उत्तीर्ण, तर ११ अभ्यासक्रमांसाठी दहावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण उमेदवार पात्र आहेत. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनासुद्धा कौशल्य प्रशिक्षण मिळून त्यांनी स्वत:च्या पायावर उभे राहावे, यासाठी त्यांना ११ अभ्यासक्रमांमध्ये संधी देण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहिती https://ift.tt/2BH1dcn या वेबसाइटवर उपलब्ध आहे. घटक सरकारी आयटीआय खासगी आयटीआय एकूण आयटीआय ४१७ ५५९ ९७६ कॅप प्रवेश क्षमता ९२३११ ४०८०३ १३३११४ मॅनेजमेंट प्रवेश क्षमता ० १३१४५ १३१४५ एकूण जागा ९२३११ ५३९४८ १४६२५९ अॅलॉटमेंट ७५०६१ १५४८० ९०५४१
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3yRMfrs
via nmkadda