Advertisement
2021: जेईई मेन्स परीक्षेचा निकाल जारी होण्यासह अॅडव्हान्स्ड २०२१ परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन प्रक्रियाही सुरू झाली आहे. जेईई मेन्स २०२१ क्वालिफाय करणाऱ्या २,५०,००० विद्यार्थी २० सप्टेंबर (रात्री २३.५९ वाजेपर्यंत) पर्यंत अॅडव्हान्स्डसाठी अर्ज करण्यास पात्र असतील. भारतीय प्रौद्योगिकी संस्था (IITs)म्हणजेच आयआयटी द्वारा प्रस्तावित विविध इंजीनियरिंग अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ इच्छितात, ते अधिकृत वेबसाइट- jeeadv.ac.in वर अर्ज करू शकतात. पण उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे तयार ठेवावी. कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता भासते... जाणून घ्या. पुढील डॉक्युमेंट्स ठेवा तयार इयत्ता दहावी, बारावीच्या गुणपत्रिका जातीचा दाखला (आवश्यक असल्यास) दिव्यांग प्रमाणपत्र किंवा पीडब्ल्यूडी प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास) जन्म प्रमाणपत्र जनरल इकोनॉमिक वीकर सेक्शन (GEN EWS) प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास) इतर मागास प्रवर्ग (ओबीसी एनसीएल) प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास) जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन कसे करायचे? जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन करणाऱ्या उमेदवारांना सर्वात आधी अधिकृत वेबसाइट- jeeadv.ac.in वर जावे लागेल. यानंतर होमपेज वर रजिस्ट्रेशन हायपरलिंक वर क्लिक करा. आता नवे लॉगिन पेज दिसेल. यानंतर जेईई मेन २०२१ अॅप्लिकेशन क्रमांक आणि पासवर्ड भरा. आता अर्जात विचारलेली माहिती भरा. जेईई अॅडव्हान्स्ड अर्जाचे शुल्क भरा. भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आऊट घेऊन ठेवा. २५ सप्टेंबर रोजी जारी होणार प्रवेशपत्र आयआयटी खरगपूर द्वारे जारी करण्यात आलेल्या अधिकृत कार्यक्रमानुसार, जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा २०२१ साठी अॅडमिट कार्ड २५ सप्टेंबर पासून डाऊनलोड करता येणार आहेत. परीक्षा ३ ऑक्टोबर रोजी आयोजित केली जाणार आहे. जेईई अॅडव्हान्स्ड २०२१ परीक्षा दोन सत्रात आयोजित केली जाणार आहे. यानुसार, पेपर १ सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत आणि पेपर २ दुपारी २.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत आयोजित केला जाणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3EtSx4D
via nmkadda