Advertisement
Registration 2021: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) खरगपूरने या वर्षीच्या अॅडव्हान्स २०२१ परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया पुन्हा पुढे ढकलली आहे. संस्थेने अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वर यासंदर्भात अपडेट जाहीर केले आहे. त्यानुसार उमेदवारांनी नोंदणीच्या माहितीसाठी वेळोवेळी पोर्टलला भेट देणे गरजेचे आहे. आयआयटी खरगपूरने याआधी १० सप्टेंबरला एक अपडेट जाहीर केले होते. त्यानुसार जेईई मेन २०२१ च्या चौथ्या टप्प्याचा निकाल जाहीर होण्यास उशीर झाल्यामुळे ११ सप्टेंबरपासून सुरू होणारी जेईई अॅडव्हान्स्ड २०२१ नोंदणी १३ सप्टेंबरपासून सुरू होईल असे सांगण्यात आले होते. जेईई मुख्य परीक्षेच्या निकालांबाबत एनटीएच्या डीजींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर विविध मीडिया रिपोर्टनुसार, सत्र ४ चा निकाल १४ सप्टेंबर किंवा १५ सप्टेंबर २०२१ पर्यंत जाहीर केला जाईल. जेईई अॅडव्हान्स नोंदणी २०२१ ची प्रक्रिया बुधवारी किंवा गुरुवारी सुरू होऊ शकते असे सांगितले जात आहे. यावर्षी ३ ऑक्टोबर रोजी प्रस्तावित जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी नोंदणी करण्यास उशीर झाल्यामुळे उमेदवारांना अर्ज केल्यानंतर अंतिम तयारीसाठी आता कमी वेळ मिळणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांच्या तयारीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि जेईई अॅडव्हान्स २०२१ परीक्षेची तारीख वाढविली जाईल अशी अपेक्षा ठेवू नये असे उमेदवारांना सांगितले जात आहे. जेईई अॅडव्हान्स २०२१ परीक्षेच्या माध्यमातून देशभरातील २३ इंडियन टेक्नोलॉजी इन्स्टिट्यूट(IITs) मध्ये, बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (BTech), बॅचलर ऑफ सायन्स (BS), ड्युअल डिग्री बीटेक एमटेक, इंटीग्रेटेड एमटेक, इंटिग्रेटेड एमएससी कोर्सच्या प्रवेशासाठी उमेदवारांची निवड केली जाते. आयआयटी खरगपूरद्वारे ज्वाइंट एडमिशन बोर्ड २०२१ (JAB)च्या निर्देशांनुसार ३ ऑक्टोबर २०२१ ला परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ntpYya
via nmkadda