JEE Main 2021: जेईई मेन परीक्षेचा निकाल कधी? NTA ने दिली महत्वाची अपडेट Rojgar News

JEE Main 2021: जेईई मेन परीक्षेचा निकाल कधी? NTA ने दिली महत्वाची अपडेट Rojgar News

JEE Main Result 2021: जेईई मेन सत्र ४ निकाल २०२१ च्या घोषणेची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. हा निकाल १४ सप्टेंबर किंवा १५ सप्टेंबर २०२१ रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. जेईई मेन २०२१ आयोजित करणारी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) चे महासंचालक विनीत जोशी यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर प्रकाशित झालेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार दोन दिवसात निकाल जाहीर होऊ शकतात. मे २०२१ मध्ये प्रस्तावित परंतु करोनामुळे ऑगस्टचा शेवटचा आठवडा आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या चौथ्या सत्राच्या परीक्षेच्या निकालाची घोषणा १४ किंवा १५ सप्टेंबरपर्यंत होऊ शकते अशी माहिती समोर येत आहे. तसेच चौथ्या सत्राच्या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका देखील जाहीर केली जाणार आहे. द्वारे जेईई मेन २०२१ निकालाच्या घोषणेची वाट पाहणाऱ्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. उमेदवारांना वेबसाइटवर अर्ज क्रमांक आणि जन्म तारीख इ. माहिती भरुन आपला निकाल पाहता येईल. परीक्षेतील प्रदर्शनाच्या आधारे उमेदवारांना आपला स्कोर, ऑल इंडिया रॅंक आणि कॅटेगरी रॅंक मिळवू शकतात. यावर्षी ३ ऑक्टोबर रोजी प्रस्तावित जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी नोंदणी करण्यास उशीर झाल्यामुळे उमेदवारांना अर्ज केल्यानंतर अंतिम तयारीसाठी आता कमी वेळ मिळणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांच्या तयारीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि जेईई अॅडव्हान्स २०२१ परीक्षेची तारीख वाढविली जाईल अशी अपेक्षा ठेवू नये असे उमेदवारांना सांगितले जात आहे. जेईई अॅडव्हान्स २०२१ परीक्षेच्या माध्यमातून देशभरातील २३ इंडियन टेक्नोलॉजी इन्स्टिट्यूट(IITs) मध्ये, बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (BTech), बॅचलर ऑफ सायन्स (BS), ड्युअल डिग्री बीटेक एमटेक, इंटीग्रेटेड एमटेक, इंटिग्रेटेड एमएससी कोर्सच्या प्रवेशासाठी उमेदवारांची निवड केली जाते. आयआयटी खरगपूरद्वारे ज्वाइंट एडमिशन बोर्ड २०२१ (JAB)च्या निर्देशांनुसार ३ ऑक्टोबर २०२१ ला परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3C7yQ0C
via nmkadda

0 Response to "JEE Main 2021: जेईई मेन परीक्षेचा निकाल कधी? NTA ने दिली महत्वाची अपडेट Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel