Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, ३ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर ०३, २०२१ WIB
Last Updated 2021-09-03T13:43:41Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

JEE Main 2021 च्या उत्तरतालिकेसंदर्भात महत्वाची अपडेट Rojgar News

Advertisement
JEE Main 2021: राष्ट्रीय परीक्षा संस्थेतर्फे देशातील आयआयटी प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली जेईई मेन सत्र -४ (JEE Main Session 4)ही परीक्षेची लवकरच जाहीर होणार आहे. या परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट Jeemain.nta.nic.in वर जाऊन उत्तरतालिका तपासू शकतात. NTA सर्वात आधी JEE मुख्य तात्पुरती उत्तरतालिका जाहीर करेल. उत्तरतालिकेमध्ये नमूद उत्तरांवर उमेदवारांना आक्षेप असल्यास तो मांडण्यासाठी उमेदवारांना वेळ दिला जाईल. मांडलेल्या आक्षेपांचा तज्ञांकडून विचार केला जाईल आणि त्यानंतर अंतिम उत्तरतालिका जाहीर केली जाईल. answer key अशी करा डाउनलोड स्टेप १: अधिकृत वेबसाइटवर जा आणि 'उत्तरतालिका" लिंकवर क्लिक करा स्टेप २ : अर्ज क्रमांक आणि पासवर्ड टाकून सबमिट करा. स्टेप ३: JEE मुख्य उत्तरतालिका स्क्रीनवर दिसेल. स्टेप ४: उत्तरतालिका डाउनलोड करा आणि तपासून घ्या. उत्तरतालिकेसोबत उमेदवारांसाठी रिस्पॉन्स शीट देखील प्रसिद्ध करण्यात येईल. उमेदवार जेईई मुख्य परीक्षेमधील त्यांचे संभाव्य गुण उत्तरतालिकेच्या गुणांशी तपासू शकतात. अपेक्षित गुण मोजताना उमेदवारांनी मार्किंग योजना लक्षात ठेवावी. जेईई-मेन परीक्षेला देशभरातून सुमारे ९२ हजारांहून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. ही मुख्य परीक्षा २६, २७ आणि ३१ ऑगस्टला आणि त्यानंतर १ आणि २ सप्टेंबरला देश आणि विदेशातील विविध ३३४ शहरांमध्ये असलेल्या परीक्षा केंद्रांवर घेतली गेली. ही परीक्षा पूर्णपणे संगणक प्रणालीच्या माध्यमातून घेण्यात आली. ही परीक्षा विविध १३ भाषांमध्ये आयोजित करण्यात आली होती. यात मराठीसह इंग्रजी, हिंदी, गुजराती, असामी, बंगाली, कन्नड, मल्याळम, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगु आणि ऊर्दू या भाषांचा समावेश होता.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3yEZP1n
via nmkadda