JEE Main Cut Off: यंदाचा कट ऑफ गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी Rojgar News

JEE Main Cut Off: यंदाचा कट ऑफ गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी Rojgar News

म. टा. प्रतिनिधी, नागपूर जेईई मेन चौथ्या सत्राचा निकाल () मंगळवारी रात्री उशिरा जाहीर झाला. यामध्ये तब्बल ४४ विद्यार्थ्यांना शंभर पर्सेंटाइल मिळाले आहे. यामध्ये राज्यातील पाच विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यात मुंबईतील अथर्व तांबट, सौरभ कुलकर्णी आणि अमेय देशमुख, स्नेहदीप गायेन, गार्गी बक्षी यांचा समावेश आहे. या परीक्षेत जेईई अॅडव्हान्ससाठी पात्र ठरण्यासाइी कट-ऑफ () ८७.८९९२२४१ इतका निश्चित झाला आहे, जो गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी झाला आहे. सर्व श्रेणींमध्ये कट ऑफ कमी झाला आहे. यासोबतच एनटीएने मे २०२१मध्ये प्रस्तावित; पण करोनामुळे ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये झालेल्या चौथ्या टप्प्यातील जेईई मेन २०२१मध्ये उपस्थित उमेदवारांची ऑल इंडिया रँक आणि परीक्षेची अंतिम उत्तरतालिका जाहीर केली जाणार आहे. एनटीएने जाहीर केलेल्या सुचनेनुसार १८ उमेदवारांनी चौथ्या सत्राच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. यात राज्यातील पाच विद्यार्थ्यांचा तर चार आंध्र प्रदेश, दोन तेलंगण आणि उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील प्रत्येकी दोन उमेदवार आहेत. जेईई मेनचे आयोजन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था आणि इतर अनेक सरकारी अनुदानित संस्थांमधील प्रवेशासाठी होते. जेईई मेनमध्ये उत्तीर्ण होणारे टॉप २.५ लाख विद्यार्थी जेईई अॅडव्हान्स्डसाठी उपस्थित राहू शकतात. जेईई मेनचे चौथे सत्र २६, २७, ३१ ऑगस्ट आणि १, २ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते. सत्र-चारमध्ये एकूण ७.३२ लाख उमेदवार उपस्थित होते. जेईई मुख्य पेपर मध्यम प्रमाणात अवघड होता. गणिताचा पेपर सर्व सत्रांमध्ये कठीण होता. तर भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राची समीक्षा सोपी होती. यंदा देशातील ३३४ शहरांत ९२५ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. अॅडव्हान्सची नोंदणी सुरू आयआयटी, एनआयटीमधील प्रवेशासाठी जेईई अॅडव्हान्स परीक्षा ३ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्याचा निकाल १५ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे. जेईई अॅडव्हान्स निकालानंतर आर्किटेक्चर अॅप्टिट्यूड टेस्ट (एएटी) घेण्यात येईल. आयआयटीमधील आर्किटेक्चर प्रोग्राममध्ये प्रवेशासाठी जेईई अॅडव्हान्स्ड एएटी परीक्षा घेण्यात येते. १५ ऑक्टोबरला ही परीक्षा होणार आहे. जेईई अॅडव्हान्सच्या नोंदणीची प्रक्रिया विदेशी विद्यार्थ्यांसाठीही सुरू झाली आहे. आयआयटी खरगपूरने दिलेल्या माहितीनुसार भारतीय विद्यार्थ्यांसाठी अर्ज प्रक्रिया संध्याकाळी सुरू होणार आहे. २० सप्टेंबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे. परदेशी उमेदवार थेट जेईई अॅडव्हान्ससाठी उपस्थित राहू शकतात. तर जेईई मेनमध्ये पात्र होण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांना टॉप २.५ लाख विद्यार्थ्यांमध्ये असणे आवश्यक आहे. नऊ लाख विद्यार्थ्यांकडून चारही सत्रांची परीक्षा विद्यार्थ्यांना एकाच वेळी परीक्षेचा ताण येऊ नये या उद्देशाने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने गतवर्षीपासून वर्षातून चार वेळा जेईईचे आयोजन करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये एक विद्यार्थी एकापेक्षा जास्त वेळा ही परीक्षा देऊन ज्या परीक्षेत जास्त गुण आहेत, ते ग्राह्य धरून प्रवेश अर्ज भरू शकतो. मात्र परीक्षेचा सराव व्हावा किंवा एका परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून अशा विविध कारणांनी बहुतांश विद्यार्थी एका पेक्षा अनेक सत्रांमध्ये ही परीक्षा देतात. यंदा देशभरातून तब्बल नऊ लाख ३९ हजार ८ विद्यार्थ्यांनी चारही सत्रांची परीक्षा दिली. चौथ्या सत्राला नोंदणी केलेले विद्यार्थी मुली ३,१९,२६२ मुले ७,२८,७४५ ट्रान्सजेंडर ५ एकूण १०,४८,०१२


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3EiODvD
via nmkadda

0 Response to "JEE Main Cut Off: यंदाचा कट ऑफ गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel