Advertisement
Result: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे राष्ट्रीय स्तरावर आयोजित केली जाणारी इंजिनीयरिंग प्रवेश परीक्षा जेईई मेन २०२१ च्या निकालाची घोषणा गुरुवार ९ सप्टेंबर २०२१ रोजी केली जाऊ शकते. च्या घोषणेनंतर उमेदवार परीक्षा पोर्टल वर लॉग-इन करून आपला जेईई मेन २०१२ निकाल, कॅटेगरी रँग आणि ओव्हरऑल रँक आदी माहिती घेऊ शकणार आहेत. एनटीए जॉइंट एंट्रन्स एक्झामिनेशन (मेन), २०२१ च्या निकालांची घोषणा अधिकृत पोर्टल, jeemain.nta.nic.in वर करणार आहे. जेईई मेन २०२१ परीक्षेत सहभागी उमेदवारांनी निकालासाठी पोर्टलला भेट देत राहावी. इंजिनीयरिंग मध्ये करियर करू इच्छिणाऱ्या आणि देशातील प्रतिष्ठित संस्था आयआयटीत प्रवेश व्हावा असे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांना जेईई मेन नंतर जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा द्यावी लागते. यावर्षी जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचे आयोजन ३ ऑक्टोबर २०२१ रोजी केले जाणार आहे. या परीक्षेत सहभागी होण्यासाठी नोंदणी प्रक्रिया ११ सप्टेंबर २०२१ पासून सुरू होणार. जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेसाठी जेईई मेन परीक्षेत पात्र ठरलेले पहिले अडीच लाख यशस्वी उमेदवारच रजिस्ट्रेशन करू शकतात. त्यामुळे शनिवार ११ सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या नोंदणी प्रक्रियेआधी जेईई मेन २०२१ च्या निकालाची घोषणा गुरुवारी केली जाण्याची दाट शक्यता आहे. मात्र, अद्याप एनटीए द्वारे अधिकृतपणे निकालाची कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही. उमेदवारांनी ताज्या माहितीसाठी पोर्टलवर लक्ष ठेवावे. पुढील स्टेप्सद्वारे पाहता येईल जेईई मेन २०२१ निकाल इंजीनियरिंग प्रवेश परीक्षत सहभागी झालेल्या उमेदवारांनी आपला जेईई मेन निकाल पाहण्यासाठी या निकालाची घोषणा झाल्यानंतर अधिकृत पोर्टलला भेट द्यावी. त्यानंतर होमपेजवर उपलब्ध केल्या जाणाऱ्या लिंकवर क्लिक करावे. यानंतर नव्या पेजवर उमेदवारांना आपले लॉगइन डिटेल्स भरून सबमिट करावे लागेल. यानंतर आपला जेईई मेन २०२१ स्कोअर उमेदवारांना पाहता येईल. कॅटेगरी आणि ओव्हरऑल रँकदेखील पाहता येणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3E3fN9p
via nmkadda