Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, १५ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर १५, २०२१ WIB
Last Updated 2021-09-15T05:43:32Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

JEE Main Result 2021: १८ टॉपर्समध्ये महाराष्ट्रातला अथर्व तांबट, पाहा संपूर्ण यादी Rojgar News

Advertisement
Main Result 2021: जेईई-मेन इंजिनीअरिंग प्रवेश परीक्षेचा निकाल मंगळवारी रात्री जाहीर झाला. यामध्ये एकूण ४४ उमेदवारांनी शंभर टक्के गुण मिळवले आहेत. एनटीएने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार १८ उमेदवारांनी चौथ्या सत्राच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. यापैकी ४ आंध्र प्रदेश, २ तेलंगणा आणि उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील प्रत्येकी २ उमेदवार आहेत. या वर्षापासून, संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) -मेन वर्षात चार वेळा आयोजित केली जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे गुण सुधारण्याची संधी मिळत आहे. याचा पहिला टप्पा फेब्रुवारी आणि दुसरा मार्चमध्ये झाला. त्यापुढील टप्प्यातील परीक्षा एप्रिल आणि मेमध्ये होणार होत्या पण देशातील करोना साथीच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आल्या. तिसरा टप्पा २० ते २५ जुलै दरम्यान तर चौथा टप्पा २६ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान घेण्यात आला. निकाल पाहण्यासाठी महत्वाच्या लिंक्स jeemain.nta.nic.in ntaresults.nic.in nta.ac.in टॉपरची यादी: विद्यार्थ्यांचे नाव आणि राज्य गौरब दास, कर्नाटक वैभव विशाल, बिहार दुग्गीनेनी वेंकट पनीश, आंध्र प्रदेश पासला वीरा शिवा, आंध्र प्रदेश कांचनपल्ली राहुल नायडू, आंध्र प्रदेश कर्णम लोकेश, आंध्र प्रदेश सिद्धांत मुखर्जी, राजस्थान मृदुल अग्रवाल, राजस्थान अंशुल वर्मा, राजस्थान कोम्मा शरण्य, तेलंगणा जोशुआ वेंकट आदित्य, तेलंगणा रुचिर बन्सल, दिल्ली (NCT) काव्या चोप्रा, दिल्ली (NCT) अमैया सिंघल, उत्तर प्रदेश पाल अग्रवाल, उत्तर प्रदेश अथर्व अभिजित तांबट, महाराष्ट्र पुलकित गोयल, पंजाब गुर अमृत सिंग, चंदीगड जेईई मेनचे चौथे सत्र २६,२७,३१ ऑगस्ट आणि १ आणि २ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते. सत्र ७ मध्ये एकूण ७.३२ लाख उमेदवार उपस्थित होते. जेईई मुख्य पेपर मध्यम प्रमाणात अवघड होता. गणिताचा पेपर सर्व सत्रांमध्ये कठीण होता. तर भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचे पुनरावलोकन सोपे होते. JEE Advanced साठी नोंदणी लवकरच सुरू जेईई मुख्य निकाल २०२१ जाहीर झाल्यानंतर आता जेईई अॅडव्हान्स्डसाठी नोंदणी सुरू केली जाईल. जेईई मेनमध्ये २ लाख ५० हजार पर्यंत रँक मिळवणारे विद्यार्थी जेईई अॅडव्हान्स्डसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांना अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in ला भेट देऊन JEE Advanced 2021 साठी नोंदणी करावी लागेल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nAqniC
via nmkadda