JEE Main Result 2021: जेईई मेन चौथ्या सत्राची कटऑफ जाहीर, 'येथे' पाहा तपशील Rojgar News

JEE Main Result 2021: जेईई मेन चौथ्या सत्राची कटऑफ जाहीर, 'येथे' पाहा तपशील Rojgar News

JEE Main Result २०२१: जेईई मेन चौथ्या सत्राचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. जेईई मुख्य निकालाची लिंक देखील सक्रिय करण्यात आली आहे. उमेदवार आता अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख किंवा पासवर्डच्या मदतीने त्यांचा निकाल तपासू शकतात. JEE Main 2021 नंतर JEE Advanced मध्ये सहभागी होण्यासाठी ८७.८९९२२४१ आहे. जो गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी झाला आहे. सर्व श्रेणींमध्ये कट ऑफ कमी झाला आहे. जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्याचा निकाल १५ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे. JEE अॅडव्हान्ड निकालानंतर आर्किटेक्चर अॅप्टिट्यूड टेस्ट (AAT) घेण्यात येईल. आयआयटीमध्ये आर्किटेक्चर प्रोग्राममध्ये प्रवेशासाठी जेईई अॅडव्हान्स्ड एएटी परीक्षा घेण्यात येते. १५ ऑक्टोबरला ही परीक्षा होणार आहे. जेईई मेनचे आयोजन इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (IIT), राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था आणि इतर अनेक सरकारी अनुदानित संस्थांमधील प्रवेशासाठी आयोजित केली जाते. जेईई मेनमध्ये उत्तीर्ण होणारे टॉप २.५ लाख विद्यार्थी जेईई अॅडव्हान्स्डसाठी उपस्थित राहू शकतात. जेईई मेनचे चौथे सत्र २६,२७,३१ ऑगस्ट आणि १, २सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते. सत्र ४ मध्ये एकूण ७.३२ लाख उमेदवार उपस्थित होते. जेईई मुख्य पेपर मध्यम प्रमाणात अवघड होता. गणिताचा पेपर सर्व सत्रांमध्ये कठीण होता. तर भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राची समीक्षा सोपी होती. यामध्ये एकूण ४४ उमेदवारांनी शंभर टक्के गुण मिळवले आहेत. एनटीएने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार १८ उमेदवारांनी चौथ्या सत्राच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. यापैकी ४ आंध्र प्रदेश, २ तेलंगणा आणि उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील प्रत्येकी २ उमेदवार आहेत. टॉपरची यादी: विद्यार्थ्यांचे नाव आणि राज्य गौरब दास, कर्नाटक वैभव विशाल, बिहार दुग्गीनेनी वेंकट पनीश, आंध्र प्रदेश पासला वीरा शिवा, आंध्र प्रदेश कांचनपल्ली राहुल नायडू, आंध्र प्रदेश कर्णम लोकेश, आंध्र प्रदेश सिद्धांत मुखर्जी, राजस्थान मृदुल अग्रवाल, राजस्थान अंशुल वर्मा, राजस्थान कोम्मा शरण्य, तेलंगणा जोशुआ वेंकट आदित्य, तेलंगणा रुचिर बन्सल, दिल्ली (NCT) काव्या चोप्रा, दिल्ली (NCT) अमैया सिंघल, उत्तर प्रदेश पाल अग्रवाल, उत्तर प्रदेश अथर्व अभिजित तांबट, महाराष्ट्र पुलकित गोयल, पंजाब गुर अमृत सिंग, चंदीगड निकाल पाहण्यासाठी महत्वाच्या लिंक्स


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hA7HLP
via nmkadda

0 Response to "JEE Main Result 2021: जेईई मेन चौथ्या सत्राची कटऑफ जाहीर, 'येथे' पाहा तपशील Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel