Advertisement
JEE Main 2021 Session 4 Result: (NTA) तर्फे JEE मुख्य परीक्षा २०२१ सत्र ४ चा निकाल १० सप्टेंबरपर्यंत जाहीर होणार आहे. या परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट Jeemain.nta.nic.in वर जाऊन आपला निकाल तपासू शकतील. निकाल तपासण्यासाठी उमेदवारांना अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख एंटर करुन लॉगिन करावे लागेल. २०२१ उत्तीर्ण होणारे टॉप २ लाख ५० हजार उमेदवार जेईई अॅडवान्स २०२१ साठी अर्ज करण्यास पात्र असतील. यावर्षी जेईई मेन ४ सत्रांमध्ये आयोजित करण्यात आली आहे. एकाहून अधिक सत्र दिलेल्या उमेदवारांची परीक्षेतील सर्वोत्तम कामगिरी गुणवत्ता यादी किंवा अंतिम निकालासाठी विचारात घेतली जाईल. जेईई मेन २०२१ चौथ्या सत्राच्या निकालासह, एनटीए अखिल भारतीय रँक यादी आणि श्रेणीवार कट ऑफ जाहीर करेल. जेईई अॅडव्हान्स्ड ३ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्याचा निकाल १५ ऑक्टोबर रोजी जाहीर होईल. ही परीक्षा JEE Advanced (AAT) आयआयटीमध्ये आर्किटेक्चर प्रोग्राममध्ये प्रवेशासाठी आहे. जेईई मेन २०२१ सत्र ४ चा निकाल असा तपासायचा सर्वात आधी अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जा. वेबसाइटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा. आता अर्ज क्रमांक आणि पासवर्डच्या मदतीने लॉगिन करा. तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. भविष्यातील उपयोगासाठी निकालाची प्रिंट काढा. जेईई-मेन परीक्षेला देशभरातून सुमारे ९२ हजारांहून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. ही मुख्य परीक्षा २६, २७ आणि ३१ ऑगस्टला आणि त्यानंतर १ आणि २ सप्टेंबरला देश आणि विदेशातील विविध ३३४ शहरांमध्ये असलेल्या परीक्षा केंद्रांवर घेतली गेली. ही परीक्षा पूर्णपणे संगणक प्रणालीच्या माध्यमातून घेण्यात आली. ही परीक्षा विविध १३ भाषांमध्ये आयोजित करण्यात आली होती. यात मराठीसह इंग्रजी, हिंदी, गुजराती, असामी, बंगाली, कन्नड, मल्याळम, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगु आणि ऊर्दू या भाषांचा समावेश होता.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jFbMQu
via nmkadda