Advertisement
Scam: सध्या सुरू असलेल्या इंजिनीअरिंग प्रवेश परीक्षेत घोटाळा करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सीबीआयने सात जणांना ताब्यात घेतले आहे. खासगी वृत्तवाहिनीने अधिकार्यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. परीक्षा देण्याच्या बदल्यात उमेदवाराकडून १५ लाख रुपये दिले जात होते हे प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे. नोएडातील एफिनिटी एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड संस्थेच्या संचालकांनी जेईई मेन परीक्षेत रँकिंग मिळवून देण्यासाठी संपूर्ण यंत्रणा तयार केली होती. त्यांचे एजंट अनेक राज्यांत विखुरलेले होते. हे एजंट जेईई मेन परीक्षेत कमी रँकिंग असलेल्या विद्यार्थ्यांना गाठून त्यांना चांगली रँकिंग आणि एनआयटी सारख्या प्रमुख संस्थेत नाव नोंदणीचं आश्वासन देत होते. याबदल्यात ते १२ ते १५ लाख रुपये मागत होते अशी माहिती समोर येत आहे. सीबीआयने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या संदर्भात १ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर दिल्ली, एनसीआर, पुणे आणि जमशेदपूर येथील २० ठिकाणी छापे टाकण्यात आले. एका खासगी कंपनी, त्याचे संचालक, तीन कर्मचारी आणि खासगी व्यक्तींसह अनेक व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांचे दलाल, सहयोगी आणि खासगी शैक्षणिक संस्थांचे कर्मचारी जेईई परीक्षा केंद्रावर तैनात होते. ताब्यात घेतलेल्या व्यक्ती आणि काही अज्ञात व्यक्तींविरोधात तपास सुरू आहे. षड्यंत्र रचणाऱ्यांपैकी किमान एक बिहारचा असल्याचेही अधिकाऱ्याने म्हटले आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकसह इतर राज्यांमधील अनेक विद्यार्थी जेईई मेनसाठी सोनीपतचे परीक्षा केंद्र निवडत होते. परीक्षा केंद्रातील सामील असलेल्या अधिकाऱ्यांच्या मदतीने संबंधित विद्यार्थ्याच्या कंप्युटरचा रिमोट एक्सेस घेऊन ते दूर कुठेतरी बसलेल्या एका व्यक्तीला द्यायचे. आणि ती व्यक्ती त्या विद्यार्थ्याच्या सर्व प्रश्नांची उत्तर देत होता अशी माहिती समोर येत आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3tfMont
via nmkadda