Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, ३ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर ०३, २०२१ WIB
Last Updated 2021-09-03T06:43:42Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

Jee Main Scam: असा झाला परीक्षेत घोटाळा, जाणून घ्या घटनाक्रम Rojgar News

Advertisement
Scam: इंजिनीअरिंग प्रवेश परीक्षेत उमेदवारांकडून १५ लाख रुपये घेऊन घोटाळा करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा भांडाफोड सीबीआयने केले आहे. याप्रकरणी सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. शैक्षणिक क्षेत्रात अशा प्रकारचे घोटाळे समोर आल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर प्रश्न निर्माण होत आहे. हा घोटाळा नेमका कसा चालायचा आणि कसा उघडकीस आला? याबद्दल जाणून घेऊया. JEE Main परीक्षेत विद्यार्थ्यांना आपली रँकिंग सुधारता यावी या उद्देशाने शिक्षण मंत्रालयाने एका वर्षात विद्यार्थ्यांना ४ वेळा जेईई मेन परीक्षा देण्याची संधी दिली होती. याच संधीचा फायदा घोटाळेबाज व्यक्तींनी घेतला. चौथ्या वेळेस परीक्षा देणारा विद्यार्थी हा खरच गरजू असणार. चांगल्या शिक्षण संस्थेत प्रवेश मिळविण्यासाठी रॅंकिंग सुधारणे हा एकमेव मार्ग विद्यार्थ्यांसमोर आहे हे या घोटाळेबाजांनी हेरले होते. त्यामुळे काही पैशांच्या बदल्यात परीक्षेत उत्तीर्ण करुन देतो आणि पाहिजे असलेल्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळवून देऊ अशी फूस त्यांनी विद्यार्थ्यांना लावली. अनेक विद्यार्थ्यांनी याला नकार दिला पण काही विद्यार्थी या जाळ्यात अडकले. जेईई मेनच्या चौथ्या संधीची परीक्षा विद्यार्थी देत होते. गुरुवारी परीक्षेचा शेवटचा दिवस होता. गेल्या तीन परीक्षांमध्ये कमी रँकिंग असलेल्या विद्यार्थ्यांना हेरण्यास आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली. परीक्षा पास करुन देण्याच्या बदल्यात विद्यार्थ्यांकडून १२ ते १५ लाख रुपये मागितले जात होते. परीक्षेत घोटाळा करण्यासाठी एफिनिटी एज्युकेशनच्या संचालकांनी हरयाणातील सोनीपतमधील एका परीक्षा केंद्राची निवड केली. तिथल्या काही कर्मचाऱ्यांसोबत साटंलोटं केलं. पैसे दिलेल्या विद्यार्थ्यांना हे परीक्षा केंद्र निवडण्यास सांगितलं. दुसरीकडे नोएडातील एफिनिटी एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड संस्थेच्या संचालकांनी जेईई मेन परीक्षेत रँकिंग मिळवून देण्यासाठी संपूर्ण यंत्रणा तयार केली होती. त्यांचे एजंट अनेक राज्यांत विखुरलेले होते. हे एजंट जेईई मेन परीक्षेत कमी रँकिंग असलेल्या विद्यार्थ्यांना गाठून त्यांना चांगली रँकिंग आणि एनआयटी सारख्या प्रमुख संस्थेत नाव नोंदणीचं आश्वासन देत होते. महाराष्ट्र आणि कर्नाटकसह इतर राज्यांमधील अनेक विद्यार्थी देखील या जाळ्यात अडतले होते. या विद्यार्थ्यांना देखील जेईई मेनसाठी सोनीपतचे परीक्षा केंद्र निवडण्यास सांगण्यात आले होते. परीक्षा केंद्रातील अधिकाऱ्यांना या घोटाळ्यास सामील करुन घेण्यात आले. त्या अधिकाऱ्यांच्या मदतीने संबंधित विद्यार्थ्याच्या कंप्युटरचा रिमोट एक्सेस देण्यात आला. दूरवर बसलेला व्यक्ती या एक्सेसने विद्यार्थ्यांच्या संपर्कात होता. विद्यार्थ्यी परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्या व्यक्तींकडून सोडवून घेत होते. नोएडातील एफिनिटी एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड संस्थेत देखील हे काम सुरु होते. संस्थेच्या संचालकांनी जेईई मेन परीक्षेत रँकिंग मिळवून देण्यासाठी संपूर्ण यंत्रणा तयार केली होती. त्यांचे एजंट अनेक राज्यांत विखुरलेले होते. पानीपत परीक्षा केंद्रातील काही कर्मचारी आणि देशातील विविध भागांमधील दलाल विद्यार्थ्यांना रिमोट एक्सेसच्या मदतीने उत्तरे मिळवून देण्यास मदत करत होते. सीबीआयला या घोटाळ्याची माहिती आधीच मिळाली होती. सीबीआयने पूर्ण तपासानंतर बुधवारीच एफआयआर दाखल केली होती. पण छापे टाकण्यासाठी परीक्षा संपण्याची वाट बघितली गेली. सीबीआयची टीम यासाठी सज्ज होती. पैसे दिलेल्या विद्यार्थ्यांसह इतर विद्यार्थी देखील ही परीक्षा देत होते. यामुळे अचानक धाड टाकल्यास संपूर्ण परीक्षेत अडचण येणार होती. त्यामुळे सीबीआयने त्याप्रमाणे प्लानिंग आखले आणि घोटाळेबाजांना रंगेहाथ पकडले. सीबीआयने या घोटाळ्याचा भांडाफोड करुन एफिनिटी एज्युकेशसह संस्थेचे संचालक सिद्धार्थ कृष्णा, विशंभरमणी त्रिपाठी आणि गोविंद वार्षेय यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यांचे दलाल, सहयोगी आणि खासगी शैक्षणिक संस्थांचे कर्मचारी जेईई परीक्षा केंद्रावर तैनात होते. ताब्यात घेतलेल्या व्यक्ती आणि काही अज्ञात व्यक्तींविरोधात तपास सुरू आहे. षड्यंत्र रचणाऱ्यांपैकी किमान एक बिहारचा असल्याचेही अधिकाऱ्याने म्हटले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2WUFjgl
via nmkadda