Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर २३, २०२१ WIB
Last Updated 2021-09-23T08:43:38Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

Lok Sabha Recruitment 2021: संसदेत विविध पदांची भरती, जाणून घ्या तपशील Rojgar News

Advertisement
Lok Sabha : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी देशाच्या संसदेत काम करण्याची मोठी संधी आहे. लोकसभा सचिवालयाने विविध पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर केले आहे. त्यानुसार कंसल्टंट, ज्युनिअर, कार्यक्रम, इव्हेंट मॅनेजर, मॅनेजर सहित इतर पदांवर भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. याअंतर्गत एकूण ११ पदांवर नियुक्ती होणार आहे. लोकसभा सचिवालयाने जाहीर केलेल्या अपडेटनुसार कंत्राटी तत्वावर कन्सल्टंटच्या पदांवर भरती केली जाईल. सुरुवातीला हा कालावधीसाठी १ वर्षाची असेल. त्यानंतर उमेदवाराच्या चांगल्या कामगिरीच्या आधारे हा कालावधी आणखी दोन वर्षे वाढवता येऊ शकते. या कालावधीत उमेदवाराच्या कामगिरीमध्ये कमी आढळल्यास लोकसभा सचिवालयाकडे कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय उमेदवाराला काढून टाकण्याचा अधिकार राखीव असेल. कॉन्ट्रॅक्ट कन्सल्टंट भरतीसाठी जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार या पदासाठी नियुक्त झालेल्या उमेदवाराल सल्लागार भाषण तयार करणे, बोलण्याचे मुद्दे, संदेश, सोशल मीडिया अकाऊंट्स आणि लोकसभा सचिवालयाशी संबंधित इतर विविध कामांची जबाबदारी असेल. अर्ज अधिकृत वेबसाइट loksabha.nic.in वर उपलब्ध आहे. उमेदवार पोर्टलवर लॉगिन करून फॉर्म भरू शकतात उमेदवारांनी लक्षात ठेवा की अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ ऑक्टोबर २०२१ आहे. रिक्त पदाचा तपशील सोशल मीडिया मार्केटिंग (सिनिअर कन्सल्टंट)- ०१, सोशल मीडिया मार्केटिंग (ज्युनिअर कन्सल्टंट) -०१, सिनिअर कंटेट रायटर/मीडिया अॅनालिस्ट (हिंदी)- ०१, ज्युनिअर कंटेट रायटर (हिंदी)- ०१, ज्युनिअर कंटेट रायटर ( इंग्रजी) -०१, सोशल मीडिया मार्केटिंग (कनिष्ठ असोसिएट)-०५, इव्हेंट मॅनेजर-०१ या पदांची भरती केली जाईल. वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. 'निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखत घेणाऱ्या मंडळासमोर वैयक्तिक मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. नोटिफिकेशननुसार, निवड झालेल्या अर्जदाराला नंतर आपली उमेदवारी मागे घेता येणार नाही. त्याला त्याच्या पदाची जबाबदारी तात्काळ स्वीकारावी लागेल. या भरतीशी संबंधित अधिक माहिती उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3u2cM4O
via nmkadda