MAHAGENCO: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत भरती Rojgar News

MAHAGENCO: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत भरती Rojgar News

2021: महाराष्ट्र राज्य वीज निर्माण कंपनीतर्फे इंजिनीअर आणि केमिस्ट पदाअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले आहे. पदाची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, पगार, अर्ज प्रक्रिया याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. या पदभरतीअंतर्गत इंजिनीअर पदाच्या ११ जागा तर केमिस्ट पदाच्या २७ जागा भरण्यात येणार आहेत. इंजिनीअर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंजिनीअरिंगमध्ये डिग्री किंवा डिप्लोमा असणे गरजेचे आहे. उमेदवाराकडे थर्मल पॉवर प्लांटमधील कामाचा ५ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. कोलसंबंधित ऑपरेशन आणि हॅंडलिंग केलेल्या उमेदवारांना पदभरतीत प्राधान्य देण्यात येणार आहे. उमेदवाराचे वय ६० वर्षांपेक्षा अधिक नसावे. यासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ४० हजार रुपये दरमहा पगार मिळेल. केमिस्ट पदासाठी उमेदवाराकडे बीएससी (केमिस्ट्री)/ एमएससी (केमिस्ट्री)/बीटेक (केमिस्ट्री) याची पदवी असणे गरजेचे आहे. थर्मल पॉवर प्लांटमधील कामाचा पाच वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. कोल सॅम्पलिंग आणि अॅनालिस्ट प्रक्रीयेचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. ही नियुक्ती ३ महिन्यांच्या कालावधीपर्यंत किंवा कोळसा पर्यवेक्षण समन्वयक एजन्सी (एसएमसी) मधील कॉन्ट्रॅक्ट संपेपर्यंत केली जाईल. उमेदवारांनी दिलेल्या नमुन्यानुसार अर्ज भरायचा आहे. तसे नसल्यास अर्ज बाद करण्यात येईल. उमेदवारांनी ८०० रुपये किंमतीची पे ऑर्डर / डिमांड ड्राफ्ट 'महाराष्ट्र राज्य पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड' च्या नावे द्यावा. मागील बाजूस स्वत:चे पूर्ण नाव लिहावे. पोस्टल ऑर्डर/मनी ऑर्डर/रोख स्वरूपात शुल्क स्वीकारली जाणार नाही. एकदा भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही, किंवा कोणत्याहीसाठी पुढील भरतीसाठी राखीव ठेवले जाणार नाही. उमेदवारांनी आपला अर्ज, संबंधित कागदपत्र, सध्याचा पासपोर्ट साइज फोटो,पे ऑर्डर / डिमांड ड्राफ्ट यासह सहाय्यक. महाव्यवस्थापक (HR-RC), लिमिटेड, एस्ट्रेला बॅटरीज विस्तार कंपाऊंड, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई ४०००१९ या पत्त्यावर पाठवावा. १५ ऑक्टोबरपर्यंत आलेल्या अर्जांचा विचार केला जाईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CM6Sbd
via nmkadda

0 Response to "MAHAGENCO: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत भरती Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel