MahaPareshan Recruitment: राज्याच्या विद्युत विभागात भरती, जाणून घ्या तपशील Rojgar News

MahaPareshan Recruitment: राज्याच्या विद्युत विभागात भरती, जाणून घ्या तपशील Rojgar News

MahaPareshan 2021: लिमिटेड, पुणे यांच्या प्रशासकीय विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीअंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २१ जागा भरण्यात येणार आहेत. वीजतंत्री ट्रेडमध्ये ही भरती केली जाणार आहे. ही भरतीमध्ये पुणे जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. शैक्षणिक आर्हता महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा किंवा या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसाय प्रशिक्षण संस्थेत उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. वयोमर्यादा या भरतीसाठी उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्षांच्या दरम्यान असावे. मागासवर्गीय उमेदवारांनी वयोमर्यादेत ५ वर्षांची शिथिलता देण्यात आली आहे. महत्वाची कागदपत्रे अर्ज भरताना जातीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. तसेच एसएससी आणि आयटीआय गुणपत्रिका यातील नाव आधारकार्डावरील नावाशी सुसंगत असल्याची खात्री करावी. पदसंख्या कमी किंवा जास्त करण्याचा तसेच पदभरती संदर्भातील सर्व निर्णय घेण्याचा अधिकार व्यवस्थापनाकडे राखीव असेल. यासंदर्भातील निर्णय उमेदवारास कळविणे बंधनकारक नसेल. निवड झालेल्या उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार विद्यावेतन दिले जाणार आहे. अर्ज करण्याची मुदत ऑनलाइन अर्ज करताना उमेदवाराने सध्य स्थितित सुरु असलेल्या ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे. यावर संपर्क न झाल्यास उमेदवाराची जबाबदारी असणार आहे. उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट https://ift.tt/2TLF6IP वर नोंदणी करुन अर्ज करायचा आहे. दिनांक ३० सप्टेंबर २०२१ रोजी रात्री ११.५९ पर्यंत आलेले अर्ज स्वीकारले जातील.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CmPLMY
via nmkadda

0 Response to "MahaPareshan Recruitment: राज्याच्या विद्युत विभागात भरती, जाणून घ्या तपशील Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel