Advertisement
Maharashtra SET 2021: महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट (Maharashtra State Eligibility Test or Maharashtra SET) परीक्षेचे प्रवेशपत्र जारी केले आहे. सावित्रीबाई पुणे फुले विद्यापीठाने (Sabitribai Pune Phule University or SPPU) अधिकृत वेबसाइट setexam.unipune.ac.in वर कार्ड जारी करण्यात आलं आहे. जे उमेदवार परीक्षेत सहभागी होणार आहेत, ते आवश्यक माहिती भरून हॉल तिकीट डाऊनलोड करू शकतात. या व्यतिरिक्त पुढे दिलेल्या डायेक्ट स्टेप्स फाॅलो करूनही अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येईल. Maharashtra SET 2021: महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट अॅडमिट कार्ड असे करा डाऊनलोड अधिकृत वेबसाइट setexam.unipune.ac.in वर जा. यानंतर 'Download Admit Card by Login/Application Number /Student's Name' लिंकवर क्लिक करा. स्क्रीन वर एक नवी विंडो उघडेल. उमेदवारांनी अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी अर्ज क्रमांक, जन्मतारी आदी माहिती घेऊन लॉगइन करावे. भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंट आऊट घेऊन ठेवावे. महत्त्वाच्या तारखा महाराष्ट्र SET 2021 अॅडमिट कार्ड जारी होण्याची तारीख- १६ सप्टेंबर २०२१ महाराष्ट्र SET 2021 परीक्षा- २६ सप्टेंबर २०२१ असिस्टंट प्रोफेसर पदासाठी आयोजित करण्यात येणारी महाराष्ट्र SET परीक्षा २६ सप्टेंबर २०२१ रोजी होणार आहे. ही परीक्षा मुंबई, पुणे, नागपुर, औरंगाबाद, सोलापूर, अमरावती, नागपूर आदी महाराष्ट्राच्या विविध परीक्षा केंद्रांवर होणार आहे. परीक्षेच्या वेळी covid १९ प्रोटोकॉल संबंधीच्या सर्व नियमांचे पालन करणार आहे. यानुसार, विद्यार्थ्यांना मास्क, सोशल डिस्टंन्सिंगचे नियम , हँड सॅनिटायझरचा उपयोग करायचा आहे. ही महाराष्ट्रातल ३७ वी आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. ९८,३६० विद्यार्थ्यांनी केली नोंदणी यावर्षी ९८,३६० विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र सेट परीक्षा २०२१ परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. उमदेवारांनी परीक्षेला बसण्याआधी यादीत आपलं नाव तपासून घ्या. महाराष्ट्र सेट २०२१ परीक्षा पेपर २ साठी आयोजित केली जाईल आणि ही परीक्षा ऑब्जेक्टिव्ह प्रकारे होईल. परीक्षेसाठी एका तासाचा अवधी असेल आणि पेपर २ हा दोन तास कालावधीचा असेल आणि प्रश्न एमसीक्यू प्रकारचे असतील.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ErsSK1
via nmkadda