Mhada Recruitment 2021: म्हाडामध्ये बंपर भरती, जाणून घ्या तपशील Rojgar News

Mhada Recruitment 2021: म्हाडामध्ये बंपर भरती, जाणून घ्या तपशील Rojgar News

Mhada Recruitment 2021: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात म्हाडामध्ये नोकरीची संधी शोधत असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. म्हाडामध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी म्हाडातर्फे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, अनुभव,वयोमर्यादा, पगार याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. उमेदवारांनी ऑनलाइन माध्यमातून अर्ज पाठवायचे आहेत. म्हाडामध्ये विविध पदांच्या ५६५ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरती अंतर्गत कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी, सहायक अभियंता (स्थापत्य), सहायक विधी सल्लागार, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहायक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक-टंकलेखक, लघुटंकलेखक, भूमापक, अनुरेखक या जागा भरल्या जाणार आहेत. रिक्त जागांचा तपशील कार्यकारी अभियंता (स्थापत्य)च्या १३ जागा, उप अभियंता (स्थापत्य)च्या १२ जागा, मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारीच्या दोन जागा, सहाय्यक अभियंता (स्थापत्य)च्या ३० जागा, सहायक विधी सल्लागारच्या २ जागा, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)च्या ११९ जागा, कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहायकच्या ६ जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकच्या ४४ जागा, सहाय्यकच्या १८ जागा, वरिष्ठ लिपिकच्या ७३ जागा, कनिष्ठ लिपिक-टंकलेखकच्या २०७ जागा, लघुटंकलेखकच्या २० जागा, भूमापकच्या ११ जागा आणि अनुरेखक पदाच्या ७ जागा रिक्त आहेत. या रिक्त पदांसाठी १७ सप्टेंबर २०२१ पासून अर्ज प्रक्रिया सुरु होत असून उमेदवारांना १४ ऑक्टोबर २०२१ या कालावधीपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. तसेच अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. पदभरतीचे पात्रता निकष समजून घेऊन त्यानंतर अर्ज करावा. अर्जामध्ये काही चूक आढळल्यास अर्ज बाद करण्यात येईल. पदभरतीमध्ये आरक्षित वर्गाला सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील म्हाडाची अधिकृत वेबसाइट https://mhada.gov या वेबसाइटवर जाहीर करण्यात आला आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ElghIj
via nmkadda

0 Response to "Mhada Recruitment 2021: म्हाडामध्ये बंपर भरती, जाणून घ्या तपशील Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel