राज्यातील MHT-CET परीक्षा १५ सप्टेंबरपासून: उदय सामंत Rojgar News

राज्यातील MHT-CET परीक्षा १५ सप्टेंबरपासून: उदय सामंत Rojgar News

Date Update: राज्यातील अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांतील प्रवेशांसाठी होणारी कॉमन एन्ट्रन्स टेस्ट अर्थात सीईटी (CET) येत्या १५ सप्टेंबरपासून आयोजित करण्यात येणार आहे. १५ सप्टेंबर २०२१ ते १० ऑक्टोबर या कालावधीत सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यासोबतच राज्यातील महाविद्यालये १ नोव्हेंबर २०२१ पासून सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. उदय सामंत म्हणाले, 'यावर्षी एकूण ८ लाख ५५ हजार ८६९ विद्यार्थी सीईटी परीक्षेला बसणार आहेत. मागील वर्षी सीईटीसाठी एकूण १९८ परीक्षा केंद्रे होती. यंदा कोविड -१९ संक्रमण स्थितीच्या पार्श्वभूमीवर या केंद्रांमध्ये वाढ करण्यात आली आहे. यंदा २२६ केंद्रांवर सीईटी परीक्षेचं आयोजन केलं जाणार आहे. यासाठी एकूण ५० हजार संगणक राज्यभर सज्ज आहेत, मात्र कोविडचं बंधन असल्यामुळे २५ हजार संगणकांचाच परीक्षेसाठी वापर होणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची नियमावली पाळून ही परीक्षा घेतली जाणार आहे.' राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षा यंदा करोनामुळे रद्द करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांचे दहावी आणि अकरावीचे गुण तसेच बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुण देऊन मूल्यांकन करण्यात आले. बारावीचा निकाल लागूनही बरेच दिवस उलटून गेले तरी सीईटी परीक्षांच्या तारखांची घोषणा झाली नव्हती, त्यामुळे विद्यार्थी हवालदिल झाले होते. राज्यातील सीईटी कक्षामार्फत या परीक्षांचे आयोजन करण्यात येते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3n8EbAw
via nmkadda

0 Response to "राज्यातील MHT-CET परीक्षा १५ सप्टेंबरपासून: उदय सामंत Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel