Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर २४, २०२१ WIB
Last Updated 2021-09-24T04:43:37Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

MMRDA अंतर्गत विविध पदांची भरती, जाणून घ्या तपशील Rojgar News

Advertisement
Recruitment 2021: महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळ मर्यादित यांच्या प्रशासकीय विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, वयोमर्यादा, अनुभव, पगार यांचा तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. एमएमआरडीएतर्फे यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांकडून यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदभरती अंतर्गत एकूण ५ जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये मुख्य अग्निशमन अधिकारी आणि अग्निशमन अधिकारी पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत मुख्य अग्निशमन अधिकारी (Chief Fire Officer) पदाची एक जागा भरण्यात येणार आहे. खुल्या गटातून ही भरती होणार आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत ईमेल आयडी recruitment.cfo@mmmocl.co.in वर मेल पाठवायचा आहे. अग्निशमन अधिकारी(Fire Officer) पदाच्या ४ जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये खुल्या गटासाठी २ जागा राखीव तर आरक्षित वर्गातून २ जागा भरण्यात येतील. इच्छुक उमेदवारांनी recruitment.fo@mmmocl.co.in या ई-मेलवर अर्ज करायचा आहे. शासनाच्या/पीएसयू/ रेल्वे/मेट्रोमध्ये कार्यरत अधिकाऱ्यांनी त्यांचे अर्ज कार्यालयामार्फत योग्य त्या मार्गाने पाठवावेत तसेच मुलाखतीला येताना ना हरकत प्रमाणपत्र (NOC) सादर करणे आवश्यक आहे असे असे आवाहन करण्यात आले आहे. या पदासाठी अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. विस्तृत जाहिरातमध्ये शैक्षणिक आर्हता, अनुभव, पगार यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. अधिकृत वेबसाइटला भेट देऊन उमेदवारांना याची माहिती मिळू शकेल. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून १६ ऑक्टोबर २०२१ पर्यंत अर्ज करायचा आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kE4Eo6
via nmkadda