MPSC job 2021: सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ Rojgar News

MPSC job 2021: सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ Rojgar News

job 2021: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे होणाऱ्या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक भरतीच्या परीक्षेसंदर्भात महत्वाची अपडेट जाहीर करण्यात आली आहे. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक भरती परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. तसेच चलनाद्वारे शुल्क स्वीकारण्याची मुदत देखील वाढविण्यात आली आहे. मुख्य परीक्षा आणि मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या पदभरतीअंतर्गत एकूण २४० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. याची मुख्य परीक्षा ३० ऑक्टोबर २०२१ रोजी होणार आहे. २६ सप्टेंबर २०२१ रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत दिलेल्या नमुन्यात अर्ज सादर करुन ऑनलाइन शुल्क भरता येणार आहे. तसेच भारतीय स्टेट बॅंकेत चलनाद्वारे शुल्क भरुन चलनाची प्रत या तारखेआधीच मिळवावी लागेल. याआधी २० सप्टेंबर २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. पदभरतीचा तपशील ऑटोमोबाइल आणि मेकॅनिकल इंजिनीअर पदवी पूर्ण असलेले उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी वयोमर्यादा १९ ते ३८ वर्षे इतकी आहे. अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून ५४४ रुपये अर्ज शुल्क भरायचा आहे. मागसवर्गीय उमेदवारांकडून ३४४ रुपये अर्ज शुल्क घेण्यात येईल. तसेच एक्स सर्व्हिसमनकडून ४४ रुपये अर्ज शुल्क आकारण्यात येईल. चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरायचे झाल्यास भारतीय स्टेट बॅंकेमध्ये २७ सप्टेंबर २०२१ पर्यंत बॅंकेच्या कार्यालयीन वेळेत भरणे आवश्यक आहे. या मुदतीनंतर शुल्क भरल्यास शुल्क वैध धरले जाणार नाही. तसेच परतही केले जाणार नाही.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lJCmrp
via nmkadda

0 Response to "MPSC job 2021: सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel