Advertisement
म. टा. प्रतिनिधी, पुणे 'महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) घेण्यात येणारी राज्य सेवा मुख्य परीक्षा () येत्या ४ ते ६ डिसेंबर रोजी, तर महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा १८ डिसेंबर रोजी होणार आहे,' अशी माहिती एमपीएससी प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मुख्य परीक्षेच्या तारखा एमपीएससीने जाहीर केल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. एमपीएससीची राज्य सेवा पूर्व परीक्षा २१ मार्च २०२१ रोजी घेण्यात आली होती. या पूर्व परीक्षेचा निकाल सहा सप्टेंबरला जाहीर झाला. सहायक राज्यकर आयुक्त, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सहायक आयुक्त, उपशिक्षणाधिकारी, कक्षाधिकारी, नायब तहसीलदार अशा विविध पदांसाठी एकूण २०० जागांसाठी राज्य सेवा परीक्षा घेण्यात येत आहे. स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २७ मार्च रोजी झाली. एकूण २१८ पदांसाठी घेण्यात असलेल्या या पूर्व परीक्षेचा निकाल तीन सप्टेंबरला जाहीर झाला. दोन्ही पूर्व परीक्षांचा निकाल सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर झाला. त्यामुळे पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचे लक्ष मुख्य परीक्षेकडे लागले होते. त्या पार्श्वभूमीवर आयोगाने मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर केल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करता येणार आहे. राज्य सेवा मुख्य परीक्षा ४ ते ६ डिसेंबरला, तर स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा १८ डिसेंबर रोजी अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक व पुणे या जिल्हा केंद्रांवर होणार असल्याचे परिपत्रक एमपीएससीने प्रसिद्ध केले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3978DD4
via nmkadda