MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित परीक्षा शनिवारी; उमेदवारांना लोकलमुभा Rojgar News

MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित परीक्षा शनिवारी; उमेदवारांना लोकलमुभा Rojgar News

Subordinate Services Prelims 2021: स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना गेले दीड वर्ष ज्या परीक्षेची प्रतीक्षा होती, ती महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणारी ‘महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२०’ शनिवारी ४ सप्टेंबर २०२१ रोजी होणार आहे. करोनामुळे अभ्यासात आलेले अडथळे, पाचवेळा लांबलेले वेळापत्रक अशा सगळ्या प्रकारानंतर उमदेवार पुन्हा तयारीत मग्न आहेत. दरम्यान, या परीक्षेला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. गुरुवारी रात्री उशिरा परीक्षार्थींना प्रवासमुभा देण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव रेल्वेकडे पाठवल्यानंतर त्याला मंजुरी देण्यात आली आहे. रेल्वे स्थानकातील खिडक्यांवर हॉलतिकीट दाखवून तिकीट मिळवता येईल, असे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. संयुक्त पूर्व परीक्षा विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, कक्ष सहायक अधिकक्ष अशा तीन पदांसाठी होत आहे. करोनामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे वेळापत्रक पुरते कोलमडले. त्यामुळे विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये राज्यभरात संताप पहायला मिळाला. गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा ३ मे २०२० रोजी होणार होती. या दरम्यान करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने परीक्षेच्या तारखा लांबल्या. त्यानंतर २०२१मध्ये परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. ही परीक्षा चार सप्टेंबर रोजी होत असून विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे. विद्यार्थी गेल्या अनेक महिन्यांपासून या परीक्षेची तयारी करत असून काही जण करोनामुळे गावी राहून तर, काही पुन्हा शहरात येऊन तयारी करत आहेत. परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करणे अधिक सोपे झाले. अडथळ्यांची शर्यत एमपीएससी २०२०चे वेळापत्रक विस्कळीत झाले. चार-पाच वेळा परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ आयोगावर आली. राज्यसेवा पूर्व परीक्षेप्रमाणे महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा -२०२० परीक्षेकडे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे सर्वाधिक लक्ष असते. संयुक्त पूर्व परीक्षेत विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, कक्ष सहायक अधिकक्ष अशा तीन पदांसाठी ही संयुक्त परीक्षा होत आहे. राज्यात जवळपास ३ लाख ६१ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेला नोंदणी केलेली आहे. यामध्ये औरंगाबाद केंद्राहून १९,६८० उमेदवार परीक्षा देणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधित विभागातील सूत्रांनी माहिती दिली. उमेदवारांना अशा आहेत सूचना.. आयोगाच्या वेबसाइटवर हॉलतिकीट डाऊनलोड करून प्रिंट केलेले मूळ स्वरूपातील प्रवेश प्रमाणपत्र आवश्यक, मास्क, तपासणी, थर्मोगनच्या सहाय्याने तापमान तपासणी, करोनाची लक्षणे असलेल्या उमेवारांची स्वतंत्र बैठक व्यवस्था करणे, ओळखीच्या पुराव्यासाठी आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड, स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स पैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र आवश्यक. त्यासह काळ्या शाईचे बॉल पॉइंट पेन, हातमोजे, फेस शिल्ड, सॅनिटायझर आदी साहित्य परीक्षा कक्षामध्ये घेऊन जाण्यास परवानगी असणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3mUsc9I
via nmkadda

0 Response to "MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित परीक्षा शनिवारी; उमेदवारांना लोकलमुभा Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel