MPSC मुख्य परीक्षेचा सुधारित निकाल जाहीर; प्रसाद चौगुले प्रथम Rojgar News

MPSC मुख्य परीक्षेचा सुधारित निकाल जाहीर; प्रसाद चौगुले प्रथम Rojgar News

2019: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) जून २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा सुधारित निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. यापूर्वीच्या परीक्षेत राज्यात पहिला आलेल्या साताऱ्याच्या प्रसाद चौगुलेने सुधारित निकालातही पहिला येण्याचा मान मिळवला आहे. मागासवर्गीय गटात राहुल कुवर या विद्यार्थ्यानेही सुधारित निकालात पहिला येण्याची कामगिरी केली आहे. मुलींमध्ये मानसी पाटील ही विद्यार्थिनी सुधारित निकालात पहिली आली आहे. एमपीएससीकडून जून २०१९ मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल गेल्या वर्षी जाहीर करण्यात आला होता. मात्र, हा निकाल सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास (SEBC) आरक्षण लागू करून जाहीर करण्यात आला होता. या आरक्षणाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने निकाल लागलेल्या सुमारे ४१३ विद्यार्थ्यांना सव्वा वर्ष नियुक्तीचे पत्र मिळाले नव्हते. त्यासंदर्भात काही महिन्यांपूर्वी या विद्यार्थ्यांनी आंदोलनही केले होते. आरक्षणाच्या मुद्द्यावर काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होऊन एसईबीसी आरक्षण रद्द करण्यात आले आणि या आरक्षणाद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांची सर्वसाधारण पद्धतीने निवड करावी, असे आदेश न्यायालयाने दिले. त्यानंतर परीक्षेचा सुधारित निकाल तयार करण्याची प्रक्रिया राबवण्याचे निर्देश राज्य सरकारकडून आयोगाला देण्यात आले. आयोगाकडून कार्यवाही करण्यात येत होती. गेले काही महिने ही प्रक्रिया सुरू होती. अखेर मंगळवारी राज्य सेवा आयोगाने हे निकाल जाहीर केले असून ४२० विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला आहे. ‘तातडीने नियुक्ती पत्र द्या’ परीक्षेचा सुधारित निकाल जाहीर झाल्याने आता उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना तातडीने नियुक्तीचे पत्र दिले जावे, अशी मागणी विद्यार्थी करीत आहेत. यापूर्वी सव्वा वर्षाहून अधिक काळ वाट पाहिल्याने आता विद्यार्थ्यांना नियुक्ती तातडीने मिळायला हवी. सरकारने पंधरा दिवसांच्या आता नियुक्तीपत्र द्यावे, अशी आग्रही मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. आता नियुक्तीचा मार्ग मोकळा निकाल लागल्याने आता नियुक्तीचा मार्ग मोकळा होईल. गेल्या वर्षभरापासून आम्ही नियुक्तीसाठी प्रयत्न करीत होतो. अखेर आता सुधारित निकाल लागल्याने सरकारने तातडीने नियुक्त्या द्याव्यात, अशी विनंती आहे. - रोहन कुवर, विद्यार्थी लवकरात लवकर रुजू करून घ्यावे करोनाचा काळ आणि आरक्षणाचा तिढा या दोन्ही गोष्टींमुळे अनेक अडथळे आले; पण आता सुधारित निकाल लागल्याने एकप्रकारे यश पुन्हा अनुभवायला मिळत आहे. आता सरकारने केवळ लवकरात लवकर रुजू करून घ्यावे, एवढीच कळकळीची विनंती आहे. - प्रसाद चौगुले, विद्यार्थी


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zO4Ghw
via nmkadda

0 Response to "MPSC मुख्य परीक्षेचा सुधारित निकाल जाहीर; प्रसाद चौगुले प्रथम Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel