Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, ९ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर ०९, २०२१ WIB
Last Updated 2021-09-09T12:43:01Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

Navy SSCO Recruitment 2021 नौदलात शॉर्ट सर्व्हिस कमीशन ऑफिसर पदांवर भरती Rojgar News

Advertisement
2021: नौदलात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय नौदलाने एक्झिक्युटिव, एज्युकेशन आणि टेक्निकल ब्रांच मध्ये शॉर्ट सर्व्हिस कमीशन ऑफिसर (SSCO) पदांवर भरतीची अधिसूचना जारी केली आहे. नौदलाद्वारे जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार एक्झिक्युटिव ब्रांचमध्ये जनरल सर्व्हिस / हायड्रो केडरची ४५, एअर ट्रॅफिक कंट्रोलरची ४, ऑब्झर्व्हरची ८, पायलटची १५ आणि लॉजिस्टिक्सच्या १८ पदांवर भरती केली जाणार आहे. याच पद्धतीने एज्युकेशन ब्रांचमध्ये एकूण १८ पदांवर आणि टेक्निकल ब्रांचमध्ये एकूण ७३ पदांवर योग्य उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज कुठे करायचा? भारतीय नौदलात विविध जाहिरातींद्वारे ब्रांच शॉर्ट सर्व्हिस कमीशन ऑफिसर (SSCO)पदांच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवार नेव्हीच्या अधिकृत भरती पोर्टल, joinindiannavy.gov.in वर उपलब्ध केलेल्या ऑनलाइन अॅप्लिकेशन फॉर्मच्या माध्यमातून अर्ज करू शकणार आहेत. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १८ सप्टेंबर २०२१ पासून सुरू होणार आहे. उमेदवार ५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत आपला ऑनलाइन अर्ज जमा करू शकणार आहेत. नेव्हीत अर्जसाठी कोणतही शुल्क आकारण्यात येणार नाही. पात्रता काय? टेक्निकल ब्रांच – भारतीय नौदलाच्या तंत्र शाखेत एसएसीओ पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून संबंधित ट्रेडमध्ये किमान ६० टक्के गुणांसह बीई/बीटीक उत्तीर्ण असायला हवे. एज्युकेशन ब्रांचसाठी उमेदवारांना संबंधित विषयांसह एमएससी किंवा एमए किंवा बीई/बीटेक ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण असायला हवे. एक्झिक्युटिव ब्रांच साठी उमेदवारांना ६० टक्के गुणांसह बीई/बीटेक किंवा एमबीए किंवा बीएससी/बीकॉम किंवा एमसीए/एमएससी (आयटी) प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा सर्व ब्रांचमधील अर्जांसाठी निर्धारित नियमानुसार, उमेदवाराचा जन्म २ जुलै १९९७ पूर्वी किंवा १ जानेवारी २००३ नंतरचा नसावा.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3l6Uhbk
via nmkadda