NEET 2021 प्रवेशपत्रातील बदलामुळे उमेदवार गोंधळात, १२ सप्टेंबरला परीक्षा Rojgar News

NEET 2021 प्रवेशपत्रातील बदलामुळे उमेदवार गोंधळात, १२ सप्टेंबरला परीक्षा Rojgar News

Admit Card: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने नीट यूजी परीक्षेला बसलेल्या उमेदवारांसाठी ६ सप्टेंबरला प्रवेशपत्र जाहीर केले. उमेदवार NTA च्या NEET परीक्षा पोर्टल neet.nta.nic.in वर त्यांचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख तपशील भरुन त्यांचे नीट २०२१ प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. NEET 2021 प्रवेशपत्रासह, NTA ने उमेदवारांसाठी एक अंडरटेकिंग आणि परीक्षेसाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना देखील जाहीर केल्या आहेत. त्यामुळे प्रवेशपत्रासोबतच याचे प्रिंटही उमेदवारांना काढावे लागत आहे. दरम्यान प्रवेशपत्रातील एक अपडेट उशीरा जाहीर झाल्याने उमेदवारांचा गोंधळ झालेला पाहायला मिळाला. देशभरातील विविध राज्यांतील एकूण १५ लाखांहून अधिक उमेदवार असणारी NEET ही सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा १२ सप्टेंबर २०२१ रोजी होणार आहे. दरम्यान NTA ने ऐनवेळी प्रवेशपत्रात केलेल्या छोट्या बदलामुळे उमेदवारांचा गोंधळ उडाला. परीक्षा पोर्टलवरून NEET 2021 प्रवेशपत्र डाउनलोड करणाऱ्या एका उमेदवाराच्या वडिलांनी आपली अडचण माध्यमांना सांगितली. ६ सप्टेंबरला त्यांनी जवळच्या सायबर कॅफेमधून प्रवेशपत्राची प्रिंट घेतली पण यानंतर, NTA द्वारे NEET प्रवेशपत्र २०२१ च्या स्वरुपात थोडा बदल करत पासपोर्ट आकाराचे छायाचित्र जोडण्यासाठी नवीन प्रवेशपत्र जाहीर केले गेले. यामुळे त्यांना सायबर कॅफेतून पुन्हा प्रवेशपत्राची प्रिंट काढावी लागली. सायबर कॅफे ऑपरेटर पाच पानांच्या प्रिंटसाठी ५० रुपये आकारतो. अशावेळी त्यांना दोनवेळा प्रिंट काढावी लागल्याची माहिती त्यांनी दिली. वैद्यकीय अभ्यास सामान्यतः खूप महाग मानला जातो पण अनेक गरीब कुटुंबांतील विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशासाठी NEET प्रवेश परीक्षेला बसतात. हे उमेदवार सरकारी महाविद्यालयांमध्ये कमी फीमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न करतात. या उमेदवारांना मर्यादित संसाधनांसह अधिक प्रयत्न करावे लागतात. जेव्हा दोन दिवसांवर परीक्षा आली असताना प्रवेशपत्रातील छोटासाही बदल त्यांच्या शेवटच्या क्षणाच्या तयारीत अडथळा आणतो. अत्यंत गरीब कुटुंबांतील विद्यार्थ्यांवर थोड्या प्रमाणात आर्थिक दबाव पडतो.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3trmxce
via nmkadda

0 Response to "NEET 2021 प्रवेशपत्रातील बदलामुळे उमेदवार गोंधळात, १२ सप्टेंबरला परीक्षा Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel