Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, १६ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर १६, २०२१ WIB
Last Updated 2021-09-16T08:43:30Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

NEET Counselling:ऑल इंडिया कोटा काऊन्सिलिंगची प्रक्रिया जाणून घ्या, 'असा' मिळतो प्रवेश Rojgar News

Advertisement
NEET Counseling: आरोग्य विज्ञान महासंचालनालयाची (Directorate General of Health Sciences, DGHS) वैद्यकीय समुपदेशन समिती (MCC) वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी नीट २०२१ काऊन्सिलिंगचे आयोजन करते. एमसीसीतर्फे ऑनलाईन माध्यमातून काऊन्सिलिंग केली जाते. ही काऊन्सिलिंग दोन फेऱ्यांमध्ये घेण्यात येईल. यानंतर एक मॉपअप राउंड असेल. मॉपअप राऊंड काऊन्सिलिंग केवळ डिम्ड/केंद्रीय विद्यापीठ आणि ईएसआयसी कॉलेजमधील रिक्त जागांसाठी आयोजित केले जाते. -शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील एकूण अंडरग्रॅज्युएट पदांच्या १५ टक्के तर पदव्युत्तर पदांच्या ५० टक्के जागांवर ऑल इंडिया कोटा अंतर्गत प्रवेश घेतला जातो. -दिल्ली विद्यापीठ (DU), BHU, AMU यासह डीम्ड विद्यापीठे / केंद्रीय विद्यापीठे / कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) मधील सर्व जागा -AIIMS आणि JIPMER मधील जागा - आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज (AFMC) - MCC आणि AFMC, पुणे द्वारा संचालित केवळ NEET पात्र उमेदवारच काऊन्सिलिंग प्रक्रेयेसाठी अर्ज करण्यास पात्र असतील. समुपदेशन प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटद्वारे नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. आपण नोंदणीसाठी खालील स्टेप्स फॉलो करु शकता. NEET 2021 काऊन्सिलिंग: या स्टेप्स करा फॉलो सर्वात आधी अधिकृत वेबसाइटवर जा. त्यानंतर काऊन्सिलिंग शुल्क भरा. आता चॉईस फिलिंग आणि लॉकिंग करा. जागा वाटप यादी जाहीर केल्यानंतर वाटप केलेल्या महाविद्यालयाकडे रिपोर्ट करणे आवश्यक आहे. असा तयार होतो नीट कटऑफ शेवटच्या क्रमांकावर ज्या विद्यार्थ्याला एका विशिष्ट महाविद्यालयात जागा वाटप केली जाते ती कॉलेज प्रवेशाची कटऑफ असते. कटऑफ दरवर्षी बदलते. परीक्षा किती कठीण आहे, प्रवेशासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची संख्या, सीट मॅट्रिक्स आणि इतर अशा विविध घटकांचा विचार करुन अधिकाऱ्यांमार्फत कटऑफ ठरवली जाते. NTA ने NEET 2021 ची परीक्षा १२ सप्टेंबर रोजी आयोजित केली होती. ही परीक्षा १३ भाषांमध्ये घेण्यात आली. NEET परीक्षा ही देशातील मेडीकल, डेंटल, आयुष आणि B.V.Sc आणि AH महाविद्यालयांसाठी प्रवेश परीक्षा आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2XvIEmj
via nmkadda