NEET परीक्षेवेळी उमेदवारांना ड्रेसकोड पाळावा लागणार, NTA कडून नियमावली जाहीर Rojgar News

NEET परीक्षेवेळी उमेदवारांना ड्रेसकोड पाळावा लागणार, NTA कडून नियमावली जाहीर Rojgar News

Dress code: देशातील सर्वोच्च वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी होणारी राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षेसाठी (NEET)प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. NEET UG परीक्षा १२ सप्टेंबर रोजी होणार आहे. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परीक्षांच्या आयोजनात अनेक नियम बदलण्यात आले आहेत. NEET परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीने () परीक्षेत बसणाऱ्या मुला -मुलींच्या ड्रेसकोडमध्येही बदल केले आहेत. यावर्षी NEET परीक्षेला बसलेल्या उमेदवारांनी ड्रेस कोडशी संबंधित नियम समजून घ्यायला हवे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांसाठी जाहीर केला आहे. नियमानुसार उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे दागिने, कोणत्याही धातूची वस्तू किंवा कम्युनिकेशन टूल्स बाळगण्याची परवानगी नसेल. परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी उमेदवारांना फेस मास्क आणि हातमोजे घालणे अनिवार्य आहे. मुलींसाठी नियम NTA ने मुलींना परीक्षेच्या दिवशी पूर्ण स्लीव्ह कपडे, भरतकाम केलेले कपडे, फुले, ब्रोच किंवा मोठे बटण असलेले कपडे टाळण्याचा सल्ला दिला आहे. या व्यतिरिक्त, उंच टाचांचे शूज आणि मोठा खिसा असलेल्या जीन्स परीक्षेवेळी परिधान करु नका अशी सूचना केली आहे. कोणत्याही प्रकारचे दागिने, कानातले, नथ, अंगठ्या, पेंडेंट, हार, बांगड्या घालणे टाळावे असेही म्हटले आहे. मुलांसाठी नियम- NTA ने मुलाला हाफ स्लीव्ह शर्ट, टी-शर्ट घालून केंद्रात येण्यास सांगितले आहे. मुलांना फूल स्लीव्हचा शर्ट घालण्याची परवानगी नाही. परीक्षेच्या दिवशी हलके कपडे परिधान करावे. झिप पॉकेट्स, मोठी बटणे, भरतकाम केलेले कपडे घालण्याची परवानगी नाही. मुलांना साधी पँट आणि ट्राऊजर घालून येण्याची परवानगी आहे. मुलांनी बंद शूज घालू नये तसेच एका सोलची चप्पल किंवा इतर साधे शूज घालण्याची परवानगी देण्यात आली आहे. NEET UG २०२१ परीक्षेला बसलेल्या उमेदवारांनी परिक्षाकेंद्रावर कोणतीही छापील किंवा लेखी साहित्य आणू नये. कागदी चिट, ज्यॉमेट्री बॉक्स/पेन्सिल बॉक्स, प्लास्टिक पाउच, कॅल्क्युलेटर, पेन, स्केल, रायटींग पॅड, पेन ड्राईव्ह, इरेजर, लॉग टेबल, इलेक्ट्रॉनिक पेन आणि स्कॅनर इ. वस्तू आणू नये अशी सूचना देण्यात आली आहे. सोशल डिस्टन्सिंग नीट परीक्षेसाठी निर्धारित केंद्रांमध्ये वर्गांची संख्या वाढविण्यात आली आहे. सोशल डिस्टन्सिंग राहण्यासाठी एका वर्गात १२ पेक्षा जास्त उमेदवार बसविले जाणार नाहीत. विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझर दिले जाईल. उमेदवारांना मास्क, सॅनिटायझर आणि हात धुणे अनिवार्य करण्यात आले आहे. सॅनिटायझर आणि हँडवॉश परीक्षा हॉलमध्ये असेल. सर्व परीक्षा केंद्रे परीक्षेच्या आधी आणि नंतर दोनदा स्वच्छ केली जाणार आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jU2zEc
via nmkadda

0 Response to "NEET परीक्षेवेळी उमेदवारांना ड्रेसकोड पाळावा लागणार, NTA कडून नियमावली जाहीर Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel