Advertisement
Admit Card: राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा अर्थात NEET PG परीक्षा (NEET PG 2021) ११ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार ६ सप्टेंबरपासून त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील. ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी यशस्वीरित्या नोंदणी केली आहे त्यांना प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाइट nbe.edu.in ला भेट देणे आवश्यक आहे. राष्ट्रीय परीक्षा मंडळाकडून NEET PG 2021 प्रवेशपत्र जाहीर करण्याच्या तारखेशी संबंधित घोषणा नुकतीच ३ सप्टेंबर रोजी करण्यात आली. Natboard.edu.in या अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात नोटीस जाहीर करण्यात आले. १८ एप्रिल २०२१ च्या परीक्षेसाठी यापूर्वी जाहीर करण्यात आलेली प्रवेशपत्रे वैध राहणार नाहीत असे नोटीसमध्ये म्हटले होते. नवीन प्रवेशपत्रे ६ सप्टेंबर रोजी अधिकृत वेबसाइट nbe.edu.in वर जाहीर केली जातील. ज्या उमेदवारांना या परीक्षेत सहभागी व्हायचे आहे ते ६ सप्टेंबरपासून वेबसाइटवर जाऊन त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील असे यात म्हटले आहे. NTA ने दिलेल्या नोटिफिकेशननुसार 'उमेदवाराला NTA च्या वेबसाइटवरून प्रवेशपत्र डाउनलोड करुन दिलेल्या केंद्रावर परीक्षेसाठी वेळेवर उपस्थित राहावे लागेल. कोणत्याही उमेदवाराला त्याच्या प्रवेशपत्रात दिलेली तारीख आणि वेळेव्यतिरिक्त परीक्षा केंद्रावर उपस्थित राहू दिले जाणार नाही. नीट परीक्षा १२ सप्टेंबरलाच- सर्वोच्च न्यायालय १२ सप्टेंबरला होणारी NEET परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. ही परीक्षा सीबीएसई कंपार्टमेंट, खासगी, पत्रव्यवहार परीक्षा एकाच दिवशी येत असल्याने परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. पण नीट परीक्षा १२ सप्टेंबर रोजी ठरलेल्या तारखेला होईल असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. आम्ही या याचिकेवर सुनावणी घेणार नाही. आम्हाला अनिश्चिततेची परिस्थिती नको आहे. परीक्षा व्हायला हवी असे या प्रकरणी न्या. ए एम खानविलकर, न्या. हृषिकेश रॉय आणि न्या. सीटी रवी कुमार यांच्या खंडपीठाने सांगितले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jN7aYF
via nmkadda