NEET SS 2021 परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर Rojgar News

NEET SS 2021 परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर Rojgar News

Online Form and Exam Date: नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन () ने नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (NEET) सुपर स्पेशालिटी २०२१ चे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. नीट एसएस 2021 परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २२ सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. यापूर्वी ही नीट एसएस प्रक्रिया (NEET SS 2021) अर्ज प्रक्रिया १४ सप्टेंबर पासून सुरू होणार होती, पण काही कारणांमुळे ती स्थगित करण्याचा निर्णय घेण्याता आला. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायंसेसने (NBEMS) आपली अधिकृत वेबसाइट ww.natboard.edu.in वर NEET SS 2021 परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जारी केले आहे. उमेदवार अधिकृत संकेतस्थळा किंवा या वृत्तात पुढे दिलेल्या थेट लिंकवर जाऊन देखील अॅप्लिकेशन शेड्युलमध्ये नव्या तारखा पाहू शकणार आहेत. नीट एसएस २०२१ रजिस्ट्रेशन शेड्युल (NEET SS 2021 new schedule) एनबीई द्वारा जारी नोटिफिकेशन नुसार, काही तांत्रिक समस्यांमुळे रजिस्ट्रेशन प्रक्रियेस विलंब झाला आहे. नव्या शेड्युलनुसार ऑनलाइन अॅप्लिकेशन प्रोसेस २२ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजल्यापासून सुरू होणार आहे आणि १२ ऑक्टोबर दुपारी ११.५५ पर्यंत सुरू राहणार आहे. करेक्शन विंडो १६ ते १८ ऑक्टोबर पर्यंत आणि फायनल एडिट विंडो २६ ते २८ ऑक्टोबर २०२१ पर्यंत सुरु राहणार आहे. कधी होणार परीक्षा? (NEET SS 2021 Exam Date) NBEMS द्वारा जारी अधिकृत नोटिसनुसार, नीट एसएस २०२१ परीक्षा १३ आणि १४ नोव्हेंबर २०२१ रोजी आयोजित केली जाणार आहे. या व्यतिरिक्त, NEET SS अॅडमिट कार्ड ५ नोव्हेंबर रोजी जारी केले जाणार आहे. जे उमेदवार अर्ज करण्यास इच्छुक आहेत, ते natboard.edu.in साइट च्या माध्यमातून परीक्षेसाठी अर्ज करू शकतील. नीट एसएस 2021 कट ऑफ आणि निकाल ३० नोव्हेंबर २०२१ रोजी जाहीर केला जाईल. एक्झाम पॅटर्न (NEET SS Exam pattern) डीएम/एमसीएच कोर्स कॉलेज अॅडमिशनसाठी सर्व खासगी वैद्यकीय महाविद्यालय, सशस्त्र बल चिकित्सा सेवा संस्था आणि सर्व डीआरएनबी सुपर स्पेशालिटी कोर्सेसमध्ये (6 वर्षीय डीआरएनबी कोर्स वगळून) प्रवेशासाठी ही प्रवेश परीक्षा आयोजित केली जाते. ही परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) असते. परीक्षा एकूण १५० गुणांसाठी आयोजित केली जाते आणि परीक्षेचा कालावधी अडीच तासांचा असतो.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2YUJZ6K
via nmkadda

0 Response to "NEET SS 2021 परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel