NEET SS: नीट सुपर स्पेशालिटी परीक्षा पॅटर्नमध्ये बदल; SC ने केंद्र आणि MCI कडून मागवलं उत्तर Rojgar News

NEET SS: नीट सुपर स्पेशालिटी परीक्षा पॅटर्नमध्ये बदल; SC ने केंद्र आणि MCI कडून मागवलं उत्तर Rojgar News

नीट एसएस २०२१ साठी परीक्षा पॅटर्नमध्ये आयत्या वेळी बदल केल्याचा आरोप करत पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टरांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडिया (MCI)ला नोटीस जारी केली आहे. या प्रकरणी आता पुढील सोमवारी सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी २० सप्टेंबर रोजी नीट सुपर स्पेशालिटी () परीक्षेच्या पॅटर्नमध्ये राष्ट्रीय परीक्षा मंडळाने अचानक आणि अखेरच्या वेळी केलेल्या बदलांना आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेतली. देशभरातील ४१ पीजी डॉक्टरांनी ही याचिका दाखल केली आहे. नीट एसएस २०२१ क्रॅक करून सुपर स्पेशालिस्ट बनण्याची संधी वैद्यकीय उमेदवारांना उपलब्ध होते. याचिकेत असा दावा केलाय की बदल करण्याचा अधिकर नसताना मनमानी पद्धतीने नीट एसएस २०२१ परीक्षेचा पॅटर्न बदलला गेला आहे. तरी त्वरित ही याचिका रद्द करावी, अशी मागणीही केली गेली आहे. न्या. डी.वाय चंद्रचूड आणि न्या. बी.वी. नागरत्न यांच्या खंडपीठाने ही सुनावणी घेतली. याचिकाकर्त्यांच्या वतीने वरिष्ठ अधिवक्ता श्याम दिवाण म्हणाले, 'यावर्षी १३/१४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी २३ जुलै २०२१ रोजी अधिसूचना जारी केली होती. मात्र नव्या परीक्षा पॅटर्नसंबंधी ३१ ऑगस्ट २०२१ रोजी आणखी एक अधिसूचना जारी केली गेली होती. प्रचलित पॅटर्न २०१८ पासून २०२० अस्तित्वात आहे, यानुसार, सुपर स्पेशलिटीच्या प्रश्नांना ६० टक्के गुण तर ४० टक्के गुण फीडर पाठ्यक्रमांच्या प्रश्नांसाठी होते. मात्र नव्या पॅटर्ननुसार, क्रिटीकल केअर सुपर स्पेशालिटीसाठी प्रश्न सामान्य मेडिसीनमधून येतील.' यामुळे अन्य विषयांच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचा दिवाण यांचा आरोप आहे. परीक्षेची अधिसूचना जारी झाल्यानंतर आणि विद्यार्थ्यांनी आपली तयारी सुरू केल्यानंतर प्राधिकरणाने हे बदल करायला नको होते, असं दिवाण यांचं म्हणणं आहे. यासंबंधीची पुढील सुनावणी २७ सप्टेंबर रोजी होणार आहे. हेही वाचा:


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CtDpCF
via nmkadda

0 Response to "NEET SS: नीट सुपर स्पेशालिटी परीक्षा पॅटर्नमध्ये बदल; SC ने केंद्र आणि MCI कडून मागवलं उत्तर Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel