Advertisement
National Education Policy: नवीन शिक्षण धोरण () -2020 देशाला ज्ञानाच्या क्षेत्रात 'जागतिक महासत्ता' बनवेल, असा विश्वास केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केला. एनसीईआरटीच्या (NCERT) ६१ व्या स्थापना दिनानिमित्त ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत होते. NEP-२०२० नुसार NCERT ने शिक्षणात व्यापक बदलासाठी तयार असले पाहिजे असेही ते म्हणाले. यावेळी शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या एनसीईआरटीच्या प्रयत्नांचे केंद्रीय मंत्र्यांनी कौतुक केले. ते म्हणाले, 'गेल्या ६० वर्षांमध्ये एनसीईआरटीने भारताच्या शिक्षण क्षेत्राला महत्त्वपूर्ण पातळीवर नेले आहे. यासाठी मी NCERT परिवाराचे अभिनंदन करतो. शालेय शिक्षण सुधारण्यासाठी परिषदेने महत्वाची भूमिका बजावली आहे. एनसीईआरटीने या वर्षांमध्ये खूप चांगले काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या शिक्षण व्यवस्थेत मोठे बदल होत आहेत.' नवीन शैक्षणिक धोरण -२०२० सर्वांसाठी दर्जेदार, परवडणारे आणि न्याय्य शिक्षण देण्यासाठी आणण्यात आले आहे. हे २१ व्या शतकातील गरजा लक्षात घेऊन बनवण्यात आले असल्याचे धर्मेंद्र प्रधान म्हणाले. जोपर्यंत शालेय शिक्षणाचा प्रश्न आहे, आम्ही २०३० पर्यंत शंभर टक्के नावनोंदणीचे लक्ष्य (GER) निश्चित केले आहे. या शिक्षण धोरणाद्वारे आपल्याला 'काय विचार करायचा' ते 'विचार कसा करावा' याकडे वळावे लागेल. हे धोरण भारताला ज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक महासत्ता बनवेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 'व्यावसायिक आणि शैक्षणिक शिक्षण जोडायला हवे' यावेळी शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार यांनी संशोधन, विकास आणि प्रशिक्षण संसाधन केंद्रातर्फे एनसीईआरटीच्या कामगिरीचे कौतुक केले.ते म्हणाले, या माध्यमातून ४२ लाख शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. स्वावलंबी भारत आणि कौशल्य ही देशाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी व्यावसायिक आणि शैक्षणिक एकत्रित करण्याच्या भूमिकेवर देखील NCERT ने भर दिला आहे.' 'हा स्थापना दिवस भूतकाळाची आठवण ठेवण्याची, आनंदी राहण्याची, आत्मनिरीक्षण करण्याची आणि भविष्यासाठी योजना करण्याची संधी असल्याचे' शिक्षण राज्यमंत्री डॉ.राजकुमार रंजन सिंह म्हणाले. या कार्यक्रमाच्यानिमित्ताने NCERT तर्फे 'डिक्शनरी ऑफ सोशियोलॉजी' नावाच्या समाजशास्त्राशी संबंधित पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. हे पुस्तक इंग्रजी, हिंदी आणि उर्दू या तीन भाषांमध्ये समाजशास्त्राशी संबंधित शब्दावली समजावून सांगते.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3taj0z5
via nmkadda