NEST Result 2021: नॅशनल एन्ट्रन्स स्क्रिनींग टेस्टचा निकाल जाहीर Rojgar News

NEST Result 2021: नॅशनल एन्ट्रन्स स्क्रिनींग टेस्टचा निकाल जाहीर Rojgar News

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च, NISER मार्फत घेण्यात आलेल्या नॅशनल एन्ट्रन्स स्क्रिनींग टेस्ट अर्थात 2021 परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. NEST 2021 लेखी परीक्षा १४ ऑगस्ट २०२१ रोजी आयोजित करण्यात आली होती. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली आहे, ते निकाल NISER ची अधिकृत वेबसाइट वर जाऊन पाहू शकतात. उमेदवारांनी ध्यानात घ्यावे की NISER आणि CEBS साठी मेरिट लिस्ट वेगवेगळी तयार करण्यात आली आहे. कसा पाहाल? स्टेप १: सर्वात आधी NEST परीक्षेच्या अधिकृत वेबसाइट वर जा. स्टेप २: NEST Result 2021 च्या लिंक वर क्लिक करा. स्टेप ३: लॉगिन करून निकाल पाहण्यासाठी आवश्यक ते क्रिडेंशियल भरा. स्टेप ४: NEST Result 2021 आता स्क्रीन वर दिसू लागेल. स्टेप ५: आता निकाल डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी स्कोर आणि मेरिट लिस्टचे प्रिंट घेऊन ठेवा. NEST 2021 परीक्षा १४ ऑगस्ट रोजी आयोजित केली होती. यापूर्वी ही परीक्षा जूनमध्ये आयोजित करण्यात येणार होती, पण कोविड १९ महामारीमुळे ही परीक्षा स्थगित करावी लागली होती. यापूर्वी NEST 2021 परीक्षेची उत्तरतालिका जारी करण्यात आली होती आणि २३ ऑगस्टपर्यंत हरकती मागवण्यात आल्या होत्या. NEST एक ऑनलाइन कॉम्प्युटर बेस्ड परीक्षआ आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (NISER) भुवनेश्वर आणि मुंबई विद्यापीठाचा अटॉमिक एनर्जी सेंटर फॉर एक्सलेंस इन बेसिक सायन्स विभाग (UM-DAE CEBS) यांच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी ही परीक्षा आयोजित करण्यात येते. देशातील अनेक शहरामध्ये ही परीक्षा आयोजित केली जाते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2WFGNeB
via nmkadda

0 Response to "NEST Result 2021: नॅशनल एन्ट्रन्स स्क्रिनींग टेस्टचा निकाल जाहीर Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel