Advertisement
- संजय मोरे सध्याच्या काळात सरकारी नोकरीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यासाठीची संधी ही उमेदवारांना मिळत आहे. पण ही संधी प्राप्त करण्यासाठी प्रथम ध्येय निश्चित करायला हवं. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी न्यू इंडिया अॅश्युरन्समध्ये अधिकारी पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या लेखात आपण त्याबाबतची माहिती घेणार आहोत. न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेडमध्ये (भारत सरकारचा उपक्रम) ३०० अधिकारी पदांसाठी भरती होणार आहे (अजा-४६, अज-२२, इमाव-८१, इडब्ल्यूएस-३०, खुला-१२१). एकूण १७ पदं दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव असतील (एचआय-४, व्हीआय-३, ओसी-३, आयडी/मल्टी-७). ० पात्रता- ३० सप्टेंबर, २०२१ पर्यंत कोणत्याही शाखेतील पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अज/दिव्यांग किमान ५५ टक्के गुण) ० वयोमर्यादा- १ एप्रिल, २०२१ पर्यंत २१ ते ३० वर्षं पूर्ण असावीत. कमाल वयोमर्यादेत सूट इमाव- ३ वर्षं, अजा/अज-५ वर्षं, दिव्यांग- १० वर्षं ० निवड पद्धती (अ) फेज १- प्रिलिमिनरी ऑनलाइन एक्झामिनेशन- ऑब्जेक्टिव्ह टाइप १०० गुणांसाठी (इंग्रजी भाषा- ३० गुण, रिझनिंग अॅबिलिटी- ३५ गुण, क्वांटिटेटीव्ह अॅप्टिट्यूड- ३५ प्रश्न) प्रत्येकी वेळ २० मिनिटं. एकूण वेळ एक तास. (ब) फेज २- मेन एक्झामिनेशन- ऑब्जेक्टिव्ह परीक्षा २०० गुणांसाठी आणि डिस्क्रीप्टिव्ह परीक्षा ३० गुणांसाठी. दोन्ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीनं घेतल्या जातील. - ऑब्जेक्टिव्ह परीक्षा- २०० गुण, वेळ २ तास, ३० मिनिटं (रिझनिंग- ५० गुण, वेळ ४० मिनिटं; इंग्रजी भाषा- ५० गुण, वेळ ४० मिनिटं; जनरल अवेअरनेस- ५० गुण, वेळ ३० मिनिटं; क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड- ५० गुण, वेळ ४० मिनिटं) - डिस्क्रीप्टिव्ह परीक्षेचा कालावधी ३० मिनिटं, गुण-३०. इंग्रजी भाषा परीक्षा (लेटर रायटिंग- १० गुण, निबंध लेखन- २० गुण) ऑब्जेक्टिव्ह टाइप पेपरमध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/४ गुण वजा केले जातील. (क) फेज ३- मुलाखत- मुख्य परीक्षेतून उमेदवार मुलाखतीसाठी निवडले जातील. ० अंतिम निवड मुख्य परीक्षा लेखी. ऑब्जेक्टिव्हसाठी ७५ गुणांचे वेटेज आणि इंटरव्ह्यूसाठी २५ गुणांचे वेटेज देऊन एकत्रित गुणांच्या आधारे अंतिम निवड केली जाईल. ० परीक्षा पूर्व प्रशिक्षण- अजा/अज/इमाव/दिव्यांग उमेदवारांना प्री-एक्झामिनेशन प्रशिक्षणाकरिता ऑनलाइन अर्ज करताना तशी नोंद करावी लागेल. प्रोबेशन कालावधी एक वर्षाचा असेल. तो आणखी सहा महिन्यांसाठी वाढवला जाऊ शकतो. ऑनलाइन अर्ज http://newindia.co.in या संकेतस्थळावर २१ सप्टेंबर, २०२१ पर्यंत करा.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2XbtByl
via nmkadda