Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, १ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर ०१, २०२१ WIB
Last Updated 2021-09-01T15:44:03Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

NIACL AO Recruitment 2021: न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीत भरती Rojgar News

Advertisement
2021: सार्वजनिक क्षेत्रातील सामान्य विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेड (NIACL) ने ३०० प्रशासकीय अधिकारी (जनरलिस्ट) किंवा एओ जनरलिस्टच्या पदांवर भरतीसाठी नुकतीच जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया बुधवार, १ सप्टेंबर २०२१ पासून सुरू झाली आहे. एनआयएसीएलने अधिकृत वेबसाईट वर AO जनरलिस्ट पदांसाठी अर्ज उपलब्ध करून दिले आहेत, ज्याद्वारे उमेदवार अर्ज करू शकतात. NIACL ने सर्व टप्पे अर्थात नोंदणी, अर्ज, शुल्क सबमिशन आणि अर्जातील दुरुस्ती यासाठी शेवटची तारीख २१ सप्टेंबर २०२१ ठरवली आहे. मात्र, त्यानंतर उमेदवार ६ ऑक्टोबर २०२१ पर्यंत त्यांच्या ऑनलाइन सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंट-आउट घेऊ शकतील. अर्जांसाठी पात्रता काय? न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेड मध्ये प्रशासकीय अधिकारी (जनरलिस्ट) पदांसाठी, फक्त तेच उमेदवार अर्ज करू शकतात ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून किमान ६० टक्के गुणांसह पदवी किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केली आहे. एससी, एसटी आणि अपंग उमेदवारांसाठी किमान गुणांची मर्यादा ५५ टक्के आहे. याव्यतिरिक्त,१ एप्रिल २०२१ रोजी उमेदवारांचे वय २१ वर्षांपेक्षा कमी आणि ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. विविध आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत सवलत दिली आहे. अधिक तपशीलासाठी भरतीची अधिसूचना पहा. निवड प्रक्रिया पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. पूर्व परीक्षा ऑक्टोबर २०२१ च्या दरम्यान घेण्यात येणार आहे, ज्यामध्ये यशस्वी घोषित उमेदवारांना नोव्हेंबर २०२१ मध्ये प्रस्तावित मुख्य परीक्षेला उपस्थित राहावे लागेल. मुख्य परीक्षेतील गुणांच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्ता यादीनुसार उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/38y99JM
via nmkadda